अतिक्रमणात काढण्यात आलेल्या गोरगरीब व्यावसायिकांसाठी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अतिक्रमणात काढण्यात आलेल्या गोरगरीब व्यावसायिकांसाठी

कोळपेवाडी/वेबटीम:-  कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. त्यामुळे या जागेवर छोटा-मोठा व्यवसाय करणा...

कोळपेवाडी/वेबटीम:- 


कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. त्यामुळे या जागेवर छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून अशा अतिक्रमणात काढण्यात आलेल्या गोरगरीब व्यावसायिकांसाठी कोपरगाव नगरपरिषदेने 'हॉकर्स झोन' तयार करावे अशा आशयाचे निवेदन नुकतेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला देण्यात आले आहे.


          मागील काही दिवसांपासून नगरपरिषदेकडून कोपरगाव शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण काढल्यामुळे गोरगरीब व हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन राहिले नाही.त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून  गोरगरीब व्यावसायिकांसाठी  कोपरगाव नगरपरिषदेने  'हॉकर्स झोन' तयार करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्विकारले.


                यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, फकीर कुरेशी आदींसह शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत