जागतिक महिला दिवस - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जागतिक महिला दिवस

आजची स्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. ती पायलट, इंजिनीअर, डॉक्टर,  पोलीस,  शिक्षक आहे आणि हे सगळं भारतात शक्य झालं ते  सावित्रीबाई आणि म...




आजची स्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. ती पायलट, इंजिनीअर, डॉक्टर,  पोलीस,  शिक्षक आहे आणि हे सगळं भारतात शक्य झालं ते  सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले, रमाबाई रानडे, महर्षी कर्वे, राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातूनच.....सन १९०२ मध्ये रमाबाई रानडे यांनी 'हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब' ची स्थापना केली तर १९०४ मध्ये  भारत महिला परिषदेची  स्थापना झाली.


समाजाचा  प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना  तोंड देत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात रुजला.


मेरी वोल्स्टनक्राफ्ट  यांच्यापासून सन १७९२ मध्ये सुरू झालेला लढा गेली 2 शतकापासून चालू आहे. या कालावधीत स्रीयांना संपत्ती, मतदान  असे वेगवेगळे अधिकार मिळाले आहे. पण वास्तव्य खरच तस आहे का?

खरच आपण महिलांना जगण्याचा अधिकार दिला आहे का? महिलांना अधिकार मिळाला आहे तो न्यायालयीन......आपण कधी देणार?


मुलीला पहिल्यापासून बोझ मानून घेणारा समाज अजूनही आहे याचं नवलच....!!!!


मुलगी गर्भवती असल्यावर सगळ्यांना असे वाटते की वंशाचा दिवा झाला पाहिजे.  तेव्हाच स्रीचे हक्क पोटात मारले जातात. पोटात असणाऱ्या मुलीलाही वाटत असेल माझ्यापेक्षा माझ्या लिंगावरती जास्त प्रेम  करनारे लोक आहे इथे. स्री मध्ये एवढी ताकद आहे की ती मृत्यूच्या गाभाऱ्यात जाऊन एका जीवाला जन्म देती. 


पुरुषांपेक्षा एका स्रीनेच दुसऱ्या स्रीचा आदर केला पाहिजे तिच्या भावना समजल्या पाहिजे. तुम्हाला सून पाहिजे मग मुलगी का नको?


आईच्या ह्दयातील शांततेत  निद्रिस्त झालेलं गीत छातीशी बिलगलेल्या बाळाच्या ओठावर खेळत पण ते गीत फक्त मुलांसाठी असत का

 समाजाला कल्पनेतील देवी घरात आली तर  अतिउत्तम पण आपल्या घरात मुलगी ही लक्ष्मी रुपात नको असती...

स्री म्हणून एक वैश्याही पोटासाठी धंदा करती. वैश्या जशीच्या तशी मांडली तर ती लोकांना ओंगळवाणी वाटती. तिलाही स्री म्हणून हक्क आहेत. तिलाही भावना आहेत.

लोकांना TV मधल्या नायिका छानच वाटतात पण खऱ्या जीवनातील नायिका असभ्य वाटतात...


एखादा मुलगा मुलीसारखा चालत , बोलत असेल किंवा त्याला रांगोळी , मेहंदी ह्या कला येत असेल तर त्याला लोक बोलतात बायला आहेस का?  त्याला हिजडा ही म्हणले जाते. तृतीयपंथी लोक म्हणजे स्री आणि पुरुषाचा संगम. त्यांना कमी लेखण्याचा  अधिकार आपल्याना  कुणी दिला?


तसेच एखादी मुलगी मुलासारखी असेल तर तिला धाडसी, निर्धास्त मुलगी समजलं जातं इथंही मुलींचे गुण नकोसे असतात.


मुलींचे आयुष्य हे तारेवरच्या कसरतीप्रमाणे असते नात्याचा  तोल संभाळावा लागतो.


स्रीला  नवरा चांगला मिळाला तर ठीक पण तोच जर नीट नसला तर तीच उभं आयुष्य नरक बनायला वेळ लागत नाही. आई-बापाच्या इज्जतीखातीर ती आपलं सगळं जीवन अश्या व्यक्तीसोबत व्यतीत करती की त्याला तिच्याशी काही घेणं देनच नसत.  एव्हढे करूनही  मुले चांगली निघाली तर ठीक नाहीतर त्या मुलांचा खापर आईच्या मस्तकी फोडला जातो. ती लाचार बनून घरात असती.


एखाद्या स्रीचा नवरा मेलेला असेल तर लोक तिला अभागी बोलतात. जस की तिने तिचा नवरा हातानी मारला.  तिला कार्यक्रमा मध्येही बोलवतानी लोक विचार करतात की विधवा आहे कस बोलवावं. नवरा नाही मग एवढा नट्टा-फट्टा का? 

 ह्या समाजाने नवरा नाही म्हणून तीच जगणंच हिरावून घेतलय. नवरा एकदाच मरतो पण ती स्री रोज मरती.


एखाद्या स्रीला  बाळ  झाला नाही तर हा समाज तिला वांज अशी पदवी देतो. तिला गर्भवतीबाई जवळ  जाऊन दिले जात नाही. परत एक स्री मनात मारली जाते.


स्रीवरती  बलात्कार झाला तर समाज बोलतो एवढ्या संध्याकाळी बाहेर का जायचे? कधीतरी स्वतःच्या मुलांनाही सांगावे स्री ची इज्जत कर. कुणी एकटी स्री असेल तर तिला तिच्या घरी पोहच कर.  लहान कपडे घातल्याने या मोबाईलमुळे बलात्कार होतात हे प्रत्येकाला वाटते पण आपण हेही विसरतो ज्यांच्यावर बलात्कार होतात त्यांनी फुल कपडे घातलेले असतात किंवा  त्या नाबालिक असतात.   बलात्कार झालेली स्री किंवा ऍसिड हल्ला झालेली स्री याना कुणीही लवकर  स्विकारत नाही.


स्री च्या योनीमध्ये स्री ची इज्जत कुणी ठेवली?  तिच्यावर बलात्कार झाला ती तिची चूक आहे का...? त्यांनी का समाजापासून तोंड लपवावे?  तोंड तर त्यानी लपावावे  ज्यांनी गुन्हा केला आहे.

 

आधीच्या काळापासूनच स्री धाडसी वृत्तीची होती आणि आहे.  राणी लक्ष्मीबाईना स्वतःच्या मरणापेक्षा स्वाभिमान मोठा वाटला.

 

स्रीवादी विचारसरणीचा पहिला उच्चार झाला तो  मेरी वाल्स्टक्राफ्ट  या तत्ववत्तीने लिहलेल्या   'A  vindication of the Right of women (1972) ' या पुस्तकातून. सन १९७२ मध्ये तिने अतिशय स्पष्टपणे लिहिले होते की , स्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. त्यामुळे पुरुषांना काय आवडत  हे  'संस्कार'  या नावाखाली  तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वतःला काय आवडते , ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच त्याचा नुसता विचार करण्याची  कुवतही ती गमावून बसते. त्यावेळी हे विधान देणं म्हणजे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चालणे. 

१९१० साली डेन्मार्क येथे परिषद घेतली त्यात १७ देशातील १०० महिला उपस्थित होत्या . त्यात मतदानाच्या अधिकारासह समान अधिकाराचे  संवर्धन या संकल्पनेस धोरणात्मक मान्यता दिली.

स्वातंत्र्यानंतर, 1950 सालापासून  भारतीय राज्यघटनेनी स्रीयाना  समानतेचा अधिकार दिला आहे.

आजची स्री स्वालंबी  आहे ती समाजाला दाखवण्यापूरती. तिला हक्क आहे ते घराबाहेर बोलण्याचे....पण घरात.....


                मनिषा रंजना बाळासाहेब लांबे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत