अहमदनगर/वेबटीम:- भारतीय नौसेना विभागात नोकरी लावून देतो असे अमिश दाखवून नगर तालुक्यातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नगर तालुका...
अहमदनगर/वेबटीम:-
भारतीय नौसेना विभागात नोकरी लावून देतो असे अमिश दाखवून नगर तालुक्यातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील अंकुश भाऊसाहेब टकले(वय-३२) याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, मी पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस तथा अभ्यास करत असून मी सन 2022 मध्ये मुंबईत नोकरी शोधण्यासाठी गेलो असता माझी कल्याण पश्चिम येथील गणेश बाबासाहेब घुगे याच्याशी ओळख झाली. त्याने मला मी भारतीय नौदलात नोकरी लावतो असे सांगितले . त्यावेळी घुगे याचा मोबाईल नंबर घेतला असता दोन दिवसाने मी भोयरे पठार येथे गावी आलो. त्यावेळी घुगे याच्याशी माझे बोलणे सुरू होते. काही दिवसाने मी घुगे यास विचारले की माझं नेव्ही मध्ये काम होऊ शकते का? त्यावर घुगे याने माझी नेव्ही मध्ये ओळख पटली असून तुझे काम करून देतो. त्या करिता ५ लाख ५० हजार द्यावे लागतील असे सांगितले. माझ्याकडे एवढे पैसे नही असे सांगितले. १ लाख ५० हजार रुपये आहेत. त्यावर मी पहिल्यांदा एक लाख रुपये दिले व नंतर ५० हजार रुपये असे एकूण १ लाख ५० हजार रुपये दिले.
त्यानंतर मी मला कोणते नेव्हीचे पत्र अथवा एकही कागद न आल्याने मी गणेश घुगे यास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी करू लागला.
त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ रोजी माझ्या मेल आयडीवर मेल आला त्यात 2 डिसेंबर रोजी भारतीय नौदलात आयएनएस चिल्का, ओरिसा हजर होण्याबाबत नमूद करण्यात आले होते. त्या मेलची प्रिंट घेऊन २ डिसेंबर रोजी मुंबई येथील नेव्हीच्या ऑफीसला लेटरबाबत चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही भरती झाली नसून सदर जॉईनिंग पत्र खोटे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मी गणेश घुगे ला फोन केला असता त्यास जॉईनिंगचे पत्र खोटे असल्याचे म्हंटलो असता त्याने तुला पाठविलेले पत्र खरे असून तुला जॉईनिंग झालेलं ठिकाणी सदर तारखेला जॉइन झाले नाही तर तुझे पैसे मिळणार नाही असे उत्तर दिले.
त्यानंतर १ डिसेंबर रोजी गणेश घुगे यास फोन करून सांगितले की, माझ्या जॉईनिगची तारीख उद्या आहे. मी जॉईन होण्याकरिता आयएनएस चिल्का, ओरीसा येथे जात आहे. तेव्हा तेथे काही कागदपत्रे आवश्यक आहे का? असे विचारले असता गणेश घुगे याचे तुम्ही कोविडचे दोन्ही डोस घेतले आहे का? अशी विचारणा केली असता त्यावर मी माझा एक डोस झाला असून दुसरा डोस अजून बाकी आहे. त्यावर घुगे याने दोन्ही डोस घेऊन जॉइन व्हावे जॉइन व्हावे लागेल असे कळविल्याने मी साधारण आठ दिवसानी दुसरा डोस घेतल्यानंतर मी गणेश यास जॉइन होण्याकरिता वारंवार फोन करून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर दिली.तेव्हा माझी फसवूनुक लोक झाल्याची खात्री झाली.
दरम्यान 28 मार्च अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भारतीय नौसेनेच्या गोपनीय विभागाने भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अंकुश भाऊसाहेब टकले यांच्या फिर्यादिवरून नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गणेश बाबासाहेब घुगे यांना अटटक करण्यात आली आहे.पुढील कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन आणि भारतीय नौसेना गोपनीय विभाग करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत