सात्रळ/वेबटीम:- काही दिवसापूर्वी शासनाची घरकुल "ड "यादी प्रसिद्ध झाली होती. या यादीत अनेक लाभार्थीचे नावे वगळण्यात आल्यान...
सात्रळ/वेबटीम:-
काही दिवसापूर्वी शासनाची घरकुल "ड "यादी प्रसिद्ध झाली होती. या यादीत अनेक लाभार्थीचे नावे वगळण्यात आल्याने यादीत नाव नसलेले पण निकर्षात बसलेले लाभार्थींनी तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.त्यानुसार शासनाच्या विस्तार अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारांच्या सूचनांनुसार फेर सर्व्हे केला होता. या संधर्भात आज राहुरीचे गट विकास अधिकारी जी. आर. खामकर यांनी गावोगावी जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात फेरसर्वेक्षण मागणी करणाऱ्या व "ड "यादीत समाविष्ट नसलेल्यांची सुनावणी घेऊन त्यांचे घरकुल बाबद स्पष्टीकरण ऐकून घेतले. यातून लवकरच नाव वगळण्यात आलेल्या नागरिकांना योग्य तो न्याय देण्याची हमी दिली.
गट विकास अधिकारी खामकर यांनी घरकुल "ड "यादीत नावे समाविष्ट करण्याच्या सुनावणी लाभार्थीं तसेच नागरिकांना सुनावणी साठी तालुक्याच्या ठिकाणी येण्याजाण्याचा वेळ वाचविण्यासाठी तसेच भाड्यापोटी होणारी आर्थिक नुकसान टाळण्यासाठीच्या उद्देशाने या सुनावणी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात घेण्याचे निर्णय घेतल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत. या सुनावणी साठी गट विकास अधिकारी खामकर यांना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. जी. दळे, टी. बी. कोकाटे, संजय राठोड, मुळे तसेच ग्राम विकास अधिकारी हैदरभाई पटेल यांनी सहकार्य केले. या प्रसंगी सात्रळ चे सरपंच सतिष ताठे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत