राहूरी फॅक्टरी/प्रतिनिधी:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चि.कुणाल संजय पाटील यांची श्रीरामपूर विधानसभा युवक काँग...
राहूरी फॅक्टरी/प्रतिनिधी:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चि.कुणाल संजय पाटील यांची श्रीरामपूर विधानसभा युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड झाली आहे. देवळाली प्रवरा परिसरात सामाजिक कार्यात प्रयत्नशील असलेल्या कुणाल पाटील हे युवक काँग्रेसच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. नुकतीच पार पडलेली युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत त्यांची ही निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,आ.लहू कानडे, श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे,शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर,बाळासाहेब चव्हाण,बाळासाहेब खांदे,अजय खिलारी, वैभव गिरमे, दीपक पठारे, डॉ.विश्वास पाटील आदींनी स्वागत केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत