राजर्षी शाहू महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान साजरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजर्षी शाहू महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान साजरे

देवळाली प्रवरा/वेबटीम:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अभियानात सामाजिक कार्यकत्या सौ. अनुराधा आहेर, प्रा.रागिनी टेकाळे व प्रा. अश्विनी चंगेडे यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात सौ.आहेर यांनी स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी अशा अभियानाची नितांत गरज आहे असे नमूद केले. प्रा. रागिनी टेकाळे यांनी स्त्री सक्षम होणे ही काळाची गरज आहे असे विधान केले. तसेच प्रा.अश्विनी चंगेडे यांनी स्त्रियांची प्रेरणास्थाने या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी हितगुज केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्वाती हापसे ह्या होत्या. कार्यक्रमाचे समन्वयक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.राजू साळवे यांनी प्रास्ताविक व व्याख्यात्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब फुलमाळी व आभार प्रदर्शन प्रा.अविनाश मेहेत्रे यांनी केले. सदर कार्यक्रम हा आभासी  पध्दतीने गूगल मिट वर साजरा करण्यात आला ज्यात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत