राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेस रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सदि...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेस रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सदिच्छा भेट दिली.
आदर्श नागरी पतसंस्थेस आज रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी भेट दिली असता चेअरमन अण्णासाहेब चोथे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे उपस्थित होते. त्यांचाही सन्मान आदर्श नागरी पतसंस्थेच्या वतीने पार पडला.
प्रसंगी बोलताना रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे म्हणाले की, ग्रामीण भागात सहकार टिकवण्याचं काम पतसंस्थेने केले आहे. संस्था स्थापन करणे खूप सोपं असतं परंतु ती टिकवणं फार गरज असते. आदर्श नागरी पतसंस्थेचे पारदर्शी कारभार करून संस्था जिवंत ठेवून समाजातील तळागाळातील घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे असे म्हणाले.
यावेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेशशेठ वाबळे, वसंतराव लोढा , ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रवी काका बोरावके, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे, उपाध्यक्ष सुधाकर कदम,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, संचालक आबासाहेब वाळुंज, हर्षद ताथेड, प्रकाश सोनी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय मोरे आदींसह अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
शेवटी चेअरमन अण्णासाहेब चोथे यांनी सर्वांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत