राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उद्या दि. ४ मार्च रोजी सकाळी १०.३० संपन्न होत असून प्रे...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उद्या दि. ४ मार्च रोजी सकाळी १०.३० संपन्न होत असून प्रेरणा पतसंस्थेच्या QR code व upi mobile app यासुविधेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या प्रेरणा पतसंस्था ३०व्या वर्षात पदार्पण करत असून कष्टकरी शेतकरी, छोट - मोठे व्यावसायिकयांना प्रेरणा पतसंस्थेने नेहमी ताकद देण्याची भूमिका बजावली आहे.त्यामुळे प्रेरणा पतसंस्था सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा लौकिक जिल्हाभर नव्हे तर राज्यात वाढत आहे. उद्या ४ मार्च रोजी या संस्थेचा २९ वा वर्धापनदिन संपन्न होत आहे.
यानिमित्ताने प्रेरणा पतसंस्थेच्या QR code व upi mobile app चा शुभारंभ रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे साहेब व ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शुभहस्ते तर माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक अरुणराव तनपुरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन वसंत लोढा ,सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे, गुहा गावच्या सरपंच उषा ताई चंद्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मॅनेजर व कर्मचारी यांनी केले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत