कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील प्रसिद्ध काळे कोचिंग क्लासेसचे संचालक कै प्रभाकर पांडुरंग काळे (सर) यांचे नुकतेच ६८ व्या वर्षी वृद्...
कोपरगाव शहर प्रतिनिधी-
कोपरगाव शहरातील प्रसिद्ध काळे कोचिंग क्लासेसचे संचालक कै प्रभाकर पांडुरंग काळे (सर) यांचे नुकतेच ६८ व्या वर्षी वृद्धपकळाने कोपरगाव येथे राहत्या घरी सोमवार दि १४ मार्च २०२२ रोजी निधन झाले.
नामदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक डॉ अनिरुद्ध काळे व अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले स्वप्नील काळे यांचे ते वडील होते. अत्यंत शिस्तप्रिय , प्रेमळ व हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून ते संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होते. त्याचा जाण्याने नामदार आशुतोष काळे यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.कै काळे सर यांचा दशक्रिया विधी बुधवार दि २३ मार्च २०२२ रोजी अमरधाम कोपरगाव येथे ठीक सकाळी १० वाजता होणार असून या प्रसंगी ह.भ.प गणपत महाराज लोहाटे यांचे प्रवचन होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत