कोल्हार(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील सह सोसायटीच्या निवडणुकीत गेल्या चार महिन्यापासून सुरु झालेल्या रणसंग्रामाला अखे...
कोल्हार(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील सह सोसायटीच्या निवडणुकीत गेल्या चार महिन्यापासून सुरु झालेल्या रणसंग्रामाला अखेर आज पूर्णविराम मिळाला, अटीतटीच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी मंडळाच्या सौ. लता दिलीप शिरसाठ यांची चेअरमन पदी, तर प्रभाकर बाबुराव जाधव यांची व्हाइसचेअरमन पदी नियुक्ती झाली,
कोल्हार खुर्द सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर गावातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, कधी त्रिशंकू, कधी दुरंगी तर कधी चौरंगी लढत होण्याची शक्यता गावातून वर्तवण्यात येतं होत्या, तर कधी बिनविरोध देखील सोसायटी निवडणूक होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले तनपुरे आणि विखे असे दोन गट निवडणूक रिंगणात उभे ठाकले,
सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडून तनपुरे गटाने श्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखली महाविकास आघाडी मंडळ स्थापन करून आपले निर्विवाद वर्चस्व सोसायटीवर स्थापन केले, याची चेअरमन निवडीची प्रक्रिया आज सोसायटी च्या कार्यालयात पार पडली, यामध्ये चेअरमन पदासाठी तनपुरे गटाकडून सौ. लता शिरसाठ तर व्हा चेअरमन पदासाठी प्रभाकर जाधव यांनी अर्ज दाखल केले, तसेच विरोधी गटाकडून चेअरमन पदासाठी रंगनाथ घोगरे तर व्हा .चेअरमन पदासाठी महेश पाटील यांनी अर्ज दाखल केले, मात्र विरोधी गटाच्या दोन्हीही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेऊन नवनिर्वाचित उमेदवारांना काम करण्याची संधी दिली, त्यानुसार सौ लता शिरसाठ यांची चेअरमन पदी तर प्रभाकर जाधव यांची व्हा. चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली, या सर्व प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी श्री नागरगोजे यांनी पहिले,
यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सोसायटीसह शंभूराजे स्वयं रोजगार सह संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत