कोपरगाव / प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगावमध्ये विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणार्या महिलांचा जिल्हा बँकेच्या संचालिका चैताल...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगावमध्ये विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणार्या महिलांचा जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे नगरसेविका तथा राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वराज्य प्रतिष्ठान हे सतत प्रभाग क्रमांक पाचमध्ये नवनवीन उपक्रम राबवत असते. त्यानुसार कोविडच्या भयावह संकटातही अंत्यसंस्कार करणार्या राधा जाधव आणि दिव्यांग असूनही कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे चालविणार्या शोभना माळी यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन महिला दिनी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याकामी विजया देवळालीकर यांच्या नेतृत्वाखाली रंजना देवळालीकर, पायल देवळालीकर, पूजा देवळालीकर, सुषमा पांडे, मनीषा लकारे, पूजा उदावंत, जया आमले, वैशाली दीक्षित, दीपाली लोणकर, अंजली उदावंत, मंगल भडकवाडे, शीतल वायखिंडे, भाग्यश्री बोरुडे, दीक्षा उनवणे आदिंनी परिश्रम घेतले. या सत्काराबद्दल पुरस्कारार्थी महिला भारावून गेल्या होत्या. त्यांनी सत्कारासाठी दखल घेतल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत