राहुरी/वेबटीम:- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम या होत्या. प्रमुख उपस्थितीत सह.न्य...
राहुरी/वेबटीम:-
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम या होत्या. प्रमुख उपस्थितीत सह.न्यायाधीश सौ.सुजाता शिंदे मॅडम, सह.न्यायाधीश कु.मया मथुरे मॅडम या होत्या सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन राहुरी न्यायालयातील महिला वकील व कोर्टातील महिला कर्मचारी स्टॉप यांनी अत्यंत व्यवस्थित केले होते महिला दिनाविषयी माहिती ॲड.पल्लवी कांबळे ,ॲड.जयश्री घावटे यांनी दिली आपल्या अध्यक्षीय प्रमुख भाषणात न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांनी महिला विषयी कायद्याची माहिती दिली.
त्याच बरोबरच महिलांच्या न्याय व हक्क अधिकार या विषयी महिलांनी जागृत रहावे व आपल्या कर्तव्याचे पालन करून आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे असे बोलून येत्या १२ मार्च २०२२.रोजीच्या लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरण ठेवण्याचे आवाहन केले .
कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित ॲड. स्वाती सांगळे,ॲड.अनिता तोडमल,ॲड.सविता गांधले,ॲड.मनीषा आढाव,ॲड.अर्चना मैंड.ॲड ,कल्याणी पागिरे,ॲड.ज्योती राऊत,ॲड.सुरेखा कुलकर्णी न्यायालयीन महिला कर्मचारी स्टॉप आदी करून सर्वच महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत