नेवासा(प्रतिनिधी):- सर्वच क्षेत्रात महिलांची कर्तबगारी चमकदार होत असल्याने भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन नेवासा येथील जिल्ह...
नेवासा(प्रतिनिधी):-
सर्वच क्षेत्रात महिलांची कर्तबगारी चमकदार होत असल्याने भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन नेवासा येथील जिल्हा व अति.सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.एम.तापकीरे यांनी केले.ते नेवासा न्यायालयात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.व्यासपीठावर या वेळी प्रमुख पाहुण्या नेवासा येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या संचालिका वंदना दीदी तसेच दुसरे जिल्हा व अति.सत्र न्या.जी.बी.जाधव,वरिष्ठ स्तर न्या.बी.यु.चौधरी,न्या.श्रीमती बी.के.पाटील,न्या.श्रीमती एस.डी. सोनी,कनिष्ठ स्तर न्या.श्रीमती ए. बी.निवारे,न्या.श्रीमती ए.एस.गुंजवटे,न्या.ए.ए.पाचारने,नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड.बी.बी.सातपुते आदी हजर होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकअँड.के.एच.वाखुरे यांनी केले.प्रमुख पाहुण्या वंदना दीदी यांचा महिला प्रतिनिधी म्हणून न्या.एस.एम.तापकीरे यांनी सत्कार व सन्मान केला.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना न्या.तापकीरे पुढे म्हणाले की,भारतीय वंशाच्या महिला परदेशातही आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.अमेरिका या महासत्ता राष्ट्राची उपराष्ट्राध्यक्ष भारतीय वंशाची महिला आहे.ऑलिम्पिक मध्ये जास्तीत जास्त पदके महिलांनी जिंकली आहेत.शेती पासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत महिला चमकदार कार्य करतांना दिसत आहेत.महिला शिवाय पुरुष ही कल्पनाच होऊ शकत नाही.त्यामुळे महिलांचा उचित सन्मान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य बनते.इतिहासातील कर्तबगार महिलांचे दाखलेही त्यांनी या वेळी दिले.
प्रमुख पाहुण्या वंदना दीदी या वेळी बोलतांना म्हणाल्या की,कायद्यात फायदा आहे.महिलांसाठी अनेक कायदे आहेत.परन्तु हे कायदे योग्य करणासाठीच वापरले गेले पाहिजेत.त्याचा दुरुपयोग होता कामा नये.महिलांनी वीर पुरुषांना जन्म दिला आहे.गर्भ संस्कारापासून याची सुरुवात होते.सध्या मोबाईलचा सुळसुळाट आहे.आईच जर मोबाईल मध्ये वेळ घालवत असेल तर मुलावर संस्कार कोण करणार?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.तूच आहे तुझ्या जीवनाची शिल्पकार,त्यामुळे जीवन सकारात्मक बनवा.महिला दिन यासाठी साजरा होतो की त्या सन्मानाला पात्र आहेत.या सन्मानाची महिलांनी किंमत ठेवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
न्या.बी.के.पाटील यांनी या वेळी महिलांसाठीचे कायदे या विषयावर प्रभावी विचार व्यक्त केले.त्यांनी काही काव्यरचना ऐकवल्या. एक स्त्री म्हणते,एकदा मी सूर्याला विचारलं,मला प्रकाश देशील?तो मला नाही म्हणाला !त्या नंतर मी त्याला वारंवार विचारल,सूर्या तू मला प्रकाश देशील?पुन्हा त्याने नाही असं म्हटलं !मग मी ठरवलं माझा प्रकाश मीच व्हायचं.माझा सूर्य मीच व्हायचं.तेव्हापासून मी अगदी एकटीच तळपत आहे त्या तेजस्वी सुर्यासारखी!आपणच आपलं प्रकाश व्हायचं,आपणच आपलं प्रकाश व्हायचं!.स्वतःच अस्तित्व स्त्रीने स्वतः निर्माण करावे.हे करत असताना आपण जेथे कोठे काम करतो त्या ठिकाणी नियमानुसार सुविधा उपलब्ध आहे की नाही हे पाहावे.स्वच्छ हवा,पाणी,पुरेसे अन्न कंपनी मालक अथवा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मालकाने पुरवले पाहिजे.नवजात बालकांसाठी पाळणाघर त्यांनी उपलब्ध करून दिले पाहिजे.कायदे मंडळांचा कायदे बनवण्याचा हेतू खुप चांगला असतो परंतु अंमलबजावणी करणे हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याचे त्या म्हणाल्या.
सूत्रसंचालन अँड.दिलीप चंगेडिया यांनी केले तर आभार अँड.जे.एन.शेख यांनी मानले.कार्यक्रमास सहाययक अधीक्षक एस.टी.लामदाडे ,श्रीमती एस.एस.उलाने, आर.व्ही.वाव्हळ,कर्मचारीवृंद,पक्षकार,विधिद्न्य बी.जे.चव्हाण,सौ.एस.एस.लवांडे,सौ टी. जी. शेख,
सौ.सोनल वाखुरे,एस.पी.शिरसाठ,बी.बी.काळे,पी.सी.नहार ,आरगडे,पी.डी.गर्जे,आदी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत