राहुरी ः वेबटीम उंबरे सोसायटीसाठी अर्ज भरण्याच्या दुसर्या दिवशी काल सोमवार अखेर 19 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये अने...
राहुरी ः वेबटीम
उंबरे सोसायटीसाठी अर्ज भरण्याच्या दुसर्या दिवशी काल सोमवार अखेर 19 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
उंबरे सोसायटीत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. सत्ताधारी गटाकडून कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे हे नेतृत्व करणार आहे. त्यांच्यामागे राहुरी कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे हे ताकद उभी करणार आहेत. तर विरोधी गटातून तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, माजी संचालक नवनाथ गंगाधर ढोकणे, माजी चेअरमन कारभारी ढोकणे, हे त्रिमूर्ती एकत्र येऊन जुन्या नव्याची मोट बांधणार असल्याचे बोलले जाते. यात, गंगाधर ढोकणे, नाना खंडू ढोकणे, मच्छिंद्र ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग, कैलास अडसुरे आदीसह अन्य काही उघड आणि काही छुपी नेतेमंडळीही असल्याची चर्चा आहे. मात्र, अर्ज माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात उंबरे सोसायटीची उमेदवारी अर्ज भरण्याची निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्यांना संस्थेचे सचिव राजेंद्र दुशिंग सहाय्यक मह्णून काम पाहत आहेत. काल सोमवारी सायंकाळपर्यंत दीपक वसंत पंडीत, विलास रघुनाथ ढोकणे, लक्ष्मण मुरलीधर तोडमल, शिवाजी जगन्नाथ आडसुरे, लंका रवींद्र ढोकणे, एकनाथ नारायण ढोकणे (सुराजी), दत्तात्रय राधाकिसन ढोकणे, अशोक नामदेव पंडीत, अशोक दामोदर ढोकणे, नानाभाऊ रघुनाथ पटारे, गोपीनाथ भानुदास ढोकणे, कल्पना जालिंदर ढोकणे, सुरेश किसन ढोकणे, नानाभाऊ भानुदास ढोकणे, भाऊसाहेब नामदेव तांबे, लिलाबाई रामभाऊ ढोकणे, सोपान नाथा दुशिंग, बाचकर भाऊसाहेब समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत