राहुरी/वेबटीम:- जागतिक ग्राहक दिनानिमित्त १५ मार्च राहुरी तहसिल कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसी...
राहुरी/वेबटीम:-
जागतिक ग्राहक दिनानिमित्त १५ मार्च राहुरी तहसिल कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात तहसीलदार शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, प्रत्येक वर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक माणुस हा प्रथम ग्राहक आहे. ग्राहक जागृती होण्याच्या दृष्टीने त्यांचे कर्तव्य यांची जाणीव ग्राहकांस व्हावी व ग्राहक सुजाण व्हावा यासाठी तहसिल कार्यालय राहुरीच्या वतीने मंगळवार दिनांक १५ मार्च रोजी राहसिल कार्यालय राहुरी येथे ठीक सकाळी १० वाजता जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी याकरीता तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून माहितीपर स्टॉल लावण्याचे आयोजित केले आहे.
सदर कार्यक्रमात तहसिल कार्यालयाच्या वतीने पुरवठा विभाग, पी.एम. किसान योजना सामाजिक अर्थसहाय ई-पिक पाहणी इ.बाबत विविध योजना सामान्य नागरीकांपर्यंत पोहचाव्यात याकरीता स्टॉल लावण्यात येणार आहे.
त्याचप्रकारे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये कृषी विभाग, पोस्ट ऑफिस, महावितरण कार्यालय, वजन मापे, बँक, परिवहन ऑफिस, शिक्षण विभाग, गॅस एजन्सी इ. विभागामार्फत शासकीय योजनांबाबत सामान्य नागरीकांना माहिती व्हावी व त्यांचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ घेण्यात यावा तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता तहसिल कार्यालय राहुरी आवारात स्टॉल लावण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी जागतीक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत