देवळाली प्रवरा नगरपरिषद व ओम शांती केंद्र आयोजितस्वर्णीम भारत की और कार्यक्रमास शहरवासियांचा प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषद व ओम शांती केंद्र आयोजितस्वर्णीम भारत की और कार्यक्रमास शहरवासियांचा प्रतिसाद

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद व ओम शांती केंद्र, देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १४ मार्च रोजी आजादी का अम...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-


देवळाली प्रवरा नगरपरिषद व ओम शांती केंद्र, देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १४ मार्च रोजी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वर्णीम भारत की और कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात  बेटी बचाव ! बेटी पढाव ! अभियानच्या समन्वयक डॉ.सुधाताई कांकरिया या स्वच्छ भारत अभियान, हरित भारत- स्वस्थ भारत, योग विद्या, महिला सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले.


  श्री.समर्थ बाबुराव पाटील मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास शहरवासीय व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

 दरम्यान मुख्याधिकारी श्री. अजित निकत यांनी देवळाली प्रवरा नगरपालिका अंतर्गत स्वच्छ भारत अभियान 2022 व वसुंधरा संवर्धन अभियान २.० अंतर्गत व विविध कार्याची माहिती दिली.



या कार्यक्रमास देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. अजित निकत साहेब, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, ओम शांती केंद्राच्या विजया दीदी, शिवचरित्रकार हसन सय्यद, माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू, प्रहार विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस,डॉ. सौ. सुधाताई कंकारीया, प्रियतमा कदम, बन्सी वाळके, अमोल दातीर, कृष्णा महांकाळ, श्री. मोटे साहेब व नगरपालिका सर्व कर्मचारी व परिसरातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


देवळाली प्रवरा नगरपालिकेचे स्वच्छता व पर्यावरण दूत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी राहूरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील विद्यार्थ्याचे स्वच्छ भारत अभियान व वसुंधरा संवर्धन यावर पथनाट्य तयार करून सादर केले. 

 

   राहूरी फॅक्टरी येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कुल येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाटयास माजी आमदार चंद्रशेखर पा. कदम यांनी विद्यार्थाना प्रोत्साहनपर  १००१ रु. पारितोषिक दिले.

     जनजागृती पथनाट्यसाठी हायस्कूलचे प्राचार्य श्री. जाधव सर, राणीताई साळवे मॅडम, विशाल तागड सर, विद्या निमसे मॅडम, अश्विनी नलगे मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. युसूफ तांबोळी सर, नितीन घोलप सर, आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपालिकेचे सहा. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत