कोपरगाव प्रतिनिधी:- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला निवडून देवून एक जबाबदारी तुम्ही पार पाडली. दोन वर्षात कोरोना संकट असतांना देखील मतदार स...
कोपरगाव प्रतिनिधी:-
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला निवडून देवून एक जबाबदारी तुम्ही पार पाडली. दोन वर्षात कोरोना संकट असतांना देखील मतदार संघाच्या विकासासाठी व कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.मात्र दुर्दैवाने शहर विकासाच्या बाबतीत राजकारण करून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे पडले आहे. त्यामुळे भविष्यात कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगराध्यक्ष होणे गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरातील गजानननगर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन ना. आशुतोष काळे यांच्याहस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये ना. आशुतोष काळे यांनी देखील सहभागी होवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. पुढे बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शाखांच्या माध्यमातून समाजातील गरजू नागरिकांना आरोग्य, सरकारी कार्यालयातील कामे मार्गी लावण्यासाठी मदत करा. त्यांच्या अडचणी समजून घेवून त्या अडचणी सोडवा. ज्या अडचणी सोडविण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी माझी गरज भासणार आहे त्या त्या ठिकाणी सर्वोतोपरी मदत करीन अशी ग्वाही दिली. यावेळी भाजप शहर सरचिटणीस शैलेश साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे ना. आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभा शिलेदार, हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. रेखा जगताप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, कृष्णा आढाव, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, शाखाध्यक्ष तेजस साबळे, उपाध्यक्ष ललित गोडसे, सहसचिव आमिर शेख, खजिनदार शैलेश कदम, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, गणेश बोरुडे, एकनाथ गंगूले, आकाश डागा, जितेंद्र गोडसे, संतोष बारसे, एकनाथ राक्षे, मुकुंद इंगळे, कैलास मंजुळ, कैलास गंगूले, राजेंद्र आभाळे, रविंद्र राऊत, मनोज नरोडे, संदीप देवळालीकर, महेश उदावंत, गौतम खंडिझोड, सागर लकारे, अमोल आढाव, मच्छिन्द्र लांबोळे, बाळासाहेब सोनटक्के, अय्युब कच्छी, पुंडलिक वायखिंडे, प्रताप गोसावी, मुन्ना पठाण, संदीप दळवी, शुभम लासुरे, माहूरकर, उपाध्ये, नारायण लांडगे, शफीक शेख, रोशन शेजवळ, रोहित खडांगळे, नितीन साबळे, तेजस लकारे, राहुल राठोड, शिवाजी कुऱ्हाडे, बाळासाहेब शिंदे, राहुल रीळ, विकि जोशी, विकी शिंदे, भाग्यश्री बोरुडे, सुषमा पांडे, सोनाली गंगूले, भारती शिंपी, शितल लोंढे, केशर लकारे, शितल वायखिंडे, कविता शिलेदार, पुजा लहिरे, रेणुका लहिरे, सोनाली बारसे, रूपाली कळसकर, अलका सोनवणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. आशुतोष काळे जेव्हा पुष्पाराजची अॅक्शन करतात.....
- पुष्पा सिनेमातील गाणी,अॅक्शन आणि डॉयलॉग प्रसिद्ध असून त्यापैकी ‘झुकेगा नही साला’ या डॉयलॉगची अॅक्शन ना. आशुतोष काळेंनी आपल्या भाषणाच्या दरम्यान करून कार्यकर्त्यांना उत्साहित केले. यावेळी उपस्थित तरुणाईने टाळ्या वाजवून विकासाच्या बाबतीत “झुकेगी नही राष्ट्रवादी, आगे ही बढेगी राष्ट्रवादी” अशा घोषणा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत