कोपरगाव प्रतिनिधी - संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या पात्र लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. असा एकही लाभार्थी वंचि...
कोपरगाव प्रतिनिधी -
संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या पात्र लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. असा एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत महसूल प्रशासनाला केल्या आहेत.
ना. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय कोपरगाव येथे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना समितीची बैठक पार पडली.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, समाजातील निराधार व्यक्तींना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचा अनेक गरजू निराधारांना पाठबळ मिळत आहे. परंतु योग्य मार्गदर्शना अभावी अनेक पात्र व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे भविष्यात मतदार संघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. यावेळी या बैठकीत ४४८ पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलदार मंजुषा गोरे, अशासकीय सदस्य नारायणराव मांजरे,शंकरराव चव्हाण, लक्ष्मण फुलकर, सौ.साधना दवंगे, बाळासाहेब साळुंके, श्रीधर कदम, राजेंद्र कोल्हे, नारायण बारसे, तुषार पोटे, राजेंद्र चौरे, सुदाम बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत