कोपरगाव प्रतिनिधी:- वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा प्रश्न निकाली निघा...
कोपरगाव प्रतिनिधी:-
वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा प्रश्न निकाली निघाला असून २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात २५ तलाठी कार्यालयांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी ६ कोटी ५२ लाख निधी मंजूर केला आहे. अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा असलेले तलाठी कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मिनी तहसील कार्यालय असते. महसूल प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात तलाठी कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. जवळपास चार गावांचा कारभार एका तलाठी कार्यालयात असल्यामुळे तसेच शेती संदर्भातील सर्व दस्ताऐवज व नोंदी या तलाठी कार्यालयात असल्यामुळे नागरिकांची नेहमीच तलाठी कार्यालयात वर्दळ असते. मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक तलाठी कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्यामुळे त्या इमारतीमध्ये तलाठी व सबंधित महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या. त्याचा त्रास तलाठी कार्यालयात काम घेवून येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना होत होता. याबाबत महसूल प्रशासनाने देखील आपल्या अडचणी ना. आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या होत्या.
त्याबाबत ना. आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला काम करण्यात येणाऱ्या अडचणी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून मतदार संघातील तलाठी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी मिळावा याबाबत महसूल खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाची महसूल खात्याने गांभीर्याने दखल घेवून मतदार संघातील तलाठी एकूण २५ तलाठी कार्यालयांना ०६ कोटी ५२ लाख निधी दिला असून त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे.
यामध्ये देर्डे कोऱ्हाळे, धोत्रे, काकडी, पोहेगाव बु., वारी, चास नळी, शिंगणापूर, संवत्सर, मंजूर, कोकमठाण, मढी बु., चादेकसारे, पढेगाव, ब्राम्हणगाव, धारणगाव, करंजी, येसगाव, तिळवणी, गोधेगाव, धामोरी, वेस, मळेगाव थडी, रांजणगाव देशमुख, जेऊर कुंभारी, कुंभारी या गावातील तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. लवकरच सर्व तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे काम सुरु होवून नागरिकांना व महसूल कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी संपुष्टात येणार आहे. तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, महसूल राज्य मंत्री ना.अब्दुल सत्तार यांचे ना. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत