राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या आरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ कुसुम संजय झगे यांच...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या आरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ कुसुम संजय झगे यांची सर्वानुमते निवड झाली. कुसुम झूगे यांना सौ आशा भारत वने यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी तथा सरपंच कर्णा जाधव यांनी कुसुम झूगे यांना घोषित केले. यावेळी माजी उपसरपंच आशा वने,मा.उपसरपंच सूनील मोरे,सहादू झूगे,प्रमोद झूगे,सुरेशदादा झूगे,नामदेवनाना झूगे,कैलास झूगे,पोपट झूगे,वंचितचे अध्यक्ष अनिल जाधव, साहेबराव जाधव, सागर देशमुख, ग्रामविकास अधिकारी भिंगारदे भाऊसाहेब,बाळासाहेब झूगे,आनंद वने,नामदेव झूगे,दत्तात्रय वने,आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत