कोरोना काळात राहुरी पंचायतसमितीच्या सर्वच विभागातील काम गौरवास्पद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना काळात राहुरी पंचायतसमितीच्या सर्वच विभागातील काम गौरवास्पद

  राहुरी/वेबटीम:- गेली 2/3 वर्षा पासून संपूर्ण जगावर जे कोरोनाचे संकट आले  त्या संकटावर मात करण्यात पंचायत समितीच्या सर्व विभागाने चांगले का...

 राहुरी/वेबटीम:-

गेली 2/3 वर्षा पासून संपूर्ण जगावर जे कोरोनाचे संकट आले  त्या संकटावर मात करण्यात पंचायत समितीच्या सर्व विभागाने चांगले काम केल्याने ह्या कर्मचाऱ्यांचा गुण गौरव व्हावा अशी इच्छा पंचायत समितीच्या पदाधिकारी ह्यांची होती.अश्या स्वरूपाचे कार्यक्रम भविष्यात होवो अशी इच्छा यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ सौं उषाताई तनपुरे ह्यांनी व्यक्त केली.

  कृषी विद्यापीठाचे डॉ अण्णासाहेब शिंदे सभागृहात आज पंचायत समितीच्या वतीने 135 कर्मचाऱ्यांचा गुण गौरव समारंभ डॉ सौं उषाताई तनपुरे ह्यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सभापती सौं बेबीताई सोडनर होत्या. यावेळी उपसभापती प्रदीप पवार गट नेते रवींद्र आढाव, माजी सभापती मनीषा ओहळ माजी सभापती व विद्यमान सदस्य सौं सुनीता निमसे बाळासाहेब लटके जिल्हा परिषद सदस्य सौं जनाबाई पैस जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे अण्णासाहेब सोडनर,गट विकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशी आदि प्रमुख उपस्थित होते.

डॉ सौं उषाताई तनपुरे ह्यांनी प्रशासनाच्या समनव्यामुळे  शासनाच्या विविध योजना तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य व गोर गरीब जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केल्यानेच पंचायत समितीच्या पदाधिकारी ह्यानी जिल्ह्यात प्रथमच तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात जो गुण गौरव कार्यकम आयोजित केला तो असाच पुढे चालू राहो. कोरोनाचे महामारी मुळे शासन प्रत्येकाला घरीच थांबा असे एकीकडे सांगत असले तरी शासनाचे शिक्षक आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका परिचारिका डॉक्टर ह्यांना मात्र जनतेमध्ये जाऊन त्यांची सेवा करावी लागत होती या काळात आपली सेवा बजावत असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही त्याला न डगमगता आपण आपले काम चोखपणे बजावल्याने राहूरी पंचायत समितीच्या पदाधिकारी ह्यानी एक कर्तव्य म्हणून तुम्हा कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गुण गौरव करण्याची इच्छा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांना बोलून दाखवली होती. त्यांचे सूचनेनुसार आज हा कार्यक्रम होत असल्याचे डॉ तनपुरे ह्यांनी सांगितले.

 पंचायत समितीचे गट नेते व माजी सभापती रवींद्र आढाव ह्यांनी आपल्या भाषणात पंचायत समितीचा जेव्हा 5 वर्षांपूर्वी कारभार हाती घेतला तेव्हा पंचायत समिती सदस्यांना कोणताही आर्थिक अधिकार नव्हता. त्यामुळे कामे करता येत नव्हती. त्यासाठी तत्कालीन राष्ट्रवादीचे विधानसभेतील गट नेते जयंत पाटील ह्यांचे नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्य यांनी एकत्र येऊन मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले त्या आंदोलना मुळे राज्यातील पंचायत समिती सदस्यांना आर्थिक अधिकार व निधी प्राप्त होऊ लागला. माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेऊन तालुक्यात जी विकास कामे करायची याबाबत मार्गदर्शन केले आरोग्य विभागाचा आढावा घेतला जनतेला आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात यासाठी मार्गदर्शन केले अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र उप केंद्राच्या अनेक अडचणी होत्या कर्मचारी वर्ग अपुरा होता रुग्णास जर तातडीने बाहेर न्यायची वेळ आली तर रुग्णवहीका नव्हत्या. आज तालुक्यात 6 रुग्णावाहीका मिळाल्या त्याचा डिझेलचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेत दरवर्षी आदर्श कर्मचारी शिक्षक पुरस्कार दिला जातो तो प्रत्येक तालुक्यात 1/2 पुरस्कार मिळतात पण पंचायत समिती स्तरावर अनेक कर्मचारी चांगले काम करत असताना ते अश्या पुरस्कारा पासून वंचित असतात म्हणून त्यांच्यासाठी आम्ही अश्या प्रकारचा गुणगौरव कार्यक्रम घेण्याचा निर्णय राज्याचे राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे ह्यांच्या सुचनेवरून आज सुरु केला असून हा पुरस्कार सोहळा भविष्यात सुरु राहावा अशी अपेक्षा यावेळी श्री आढाव ह्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे ह्यांनी राहुरी पंचायत समितीच्या जागेचा चांगला सदुपयोग व्हावा यासाठी 1997 साली सौं सुनीता निमसे सभापती असताना ही कल्पना माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्याचें कडे मांडला होता. त्यास त्यांनी मान्यता दिली पण त्यानंतर 15 वर्ष पंचायत समिती विरोधकांच्या ताब्यात असल्याने त्यास चालना मिळाली नाही 15 वर्षानंतरचा पंचायत समिती माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे ताब्यात येताच तत्कालीन सभापती सौं मनीषा ओहळ व रवींद्र आढाव उपसभापती असताना ह्या पदाधिकारी ह्यांनी सदर इमारतीचा प्रस्ताव दाखल केला आज पंचायत समितीच्या 5 एकर  जागेत 35 कोटी रुपयाचे मोठे व्यापारी संकुल कर्मचारी निवासस्थान व सभागृह  बांधण्यात येत असून त्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

यावेळी रवींद्र अरगडे,सुनिल शेलार सर्जेराव राऊत सुरेखा शिंदे उपसभापती प्रदीप पवार सदस्य बाळासाहेब लटके ह्यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक गट विकास अधिकारी गोविंद खामकर ह्यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर उपभियंता संजय खिळे विनायक मुळे वसंत राऊत आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे सर ह्यांनी केले. आभार उपसभापती प्रदीप पवार ह्यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत