सात्रळ/वेबटीम:- श्री.शंकर गाडेकर श्री.सिताराम धोंडिबा शिंदे पंचायत समिती, राहुरी तर्फे नुकत्याच जाहीर झालेल्य...
सात्रळ/वेबटीम:-
पंचायत समिती, राहुरी तर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवंत कर्मचारी पुरस्कारप्रधान कार्यक्रमात सोनगाव येथील रहिवासी असलेले सिताराम धोंडिबा शिंदे यांना गुणवंत जलसुरक्षक पुरस्कार तर शंकर बाळाजी गाडेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सिताराम शिंदे हे सोनगाव ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विभागात काम करत असून गावच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन तसेच पाणी वाटपात कोणत्याही ग्रामस्थांची तक्रार न येता वाटपाचा हातखंडा आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेले शंकर गाडेकर हे सध्या निंभेरे येथील ज़िल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक या पदावर काम करत असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोनगाव ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार विजेत्यांचा सत्कार तसेच सात्रळ सोनगाव पंचक्रोशी सुवर्णकार समाजाच्या अध्यक्ष पदी सुनील सात्रळकर व उपाध्यक्षपदी राजुशेठ बुऱ्हाडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थाचे संचालक सुभाषमामा अंत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विखे साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव अंत्रे, राजेंद्र अनाप, मुळा प्रवरा इले. सोसायटी चे संचालक मछिंद्र अंत्रे, भा ज पा तालुका उपाध्येक्ष नारायण घनवट , सोनगावचे उपसरपंच किरण अंत्रे, पाराजी घनवट ,संतोष शेट लोढा, एजाज तांबोळी, मोह्हम्मद तांबोळी, संदीप अनाप, खंडू घोडके, सचिन अंत्रे, आबासाहेब अंत्रे, पांडुरंग पवार, संजय शिंदे, नन्हूभाई तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तिथ होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत