सात्रळ/वेबटीम:- वाचन हा समृद्ध मानवी जीवनाचा पाया आहे . आजचा वाचक हा उद्याचा लेखक आणि नेता असतो . टुडेज रीडर इज टुमारोज लीडर असे प्रतिपादन स...
सात्रळ/वेबटीम:-
वाचन हा समृद्ध मानवी जीवनाचा पाया आहे . आजचा वाचक हा उद्याचा लेखक आणि नेता असतो . टुडेज रीडर इज टुमारोज लीडर असे प्रतिपादन साहित्यिक व वक्ते डॉ . संजय गोर्डे यांनी केले .
अक्षर मानव वाचनालय व रयत शिक्षण संकुल सात्रळ यांनी आयोजित केलेल्या ' वाचू आनंदे ' या मुक्त संवाद कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षर मानव वाचनालयाचे संस्थापक पंकज अरुण कडू पाटील हे होते .
मुक्त संवाद कार्यक्रमात रयत शिक्षण संकुलातील शंभर उत्कृष्ट विद्यार्थी वाचकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला .
वाचनाचे जीवनातील महत्त्व, वाचनाची वेळ कोणती असावी ? कविता करण्यास सुरुवात कशी करावी? वाचलेले स्मरणात कसे ठेवावे ? टीनएजमध्ये नेमकी कोणती पुस्तके वाचावीत ? टीपणे कशी काढावीत? पुस्तकाचा सारांश कसा काढावा ? स्वतः लिहिते कसे व्हावे ? अशा विद्यार्थी वाचकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गोर्डे यांनी आपल्या विनोदी शैलीत उत्तरे दिली . विनोद, किस्से, कविता, विचार , उदाहरणे , दाखले यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी वाचकांशी मुक्त संवाद साधला . काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
अक्षर मानव वाचनालय व रयत संकुल शंभर उत्कृष्ट वाचक घडविण्यासाठी हा प्रकल्प राबवत असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता वाचनासोबत अजूनही काही नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी राबवणार असून त्यासाठी शिक्षकांचे चांगले सहकार्य लाभत असल्याची भावना पंकज अरुण कडू पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केली .
या कार्यक्रमासाठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निबे ए. व्ही ,श्री. अशोक भुसारी, वाचनालयाचे संचालक श्री. सचिन पवार उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कडलग यांनी केले तर आभार सच्चीदानंद झावरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत