राहुरी(प्रतिनिधी):- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला हा रस्ता म्हणजे शहराचे प्रवेशद्वार असलेला व शहराचे सौंदर्...
राहुरी(प्रतिनिधी):-
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला हा रस्ता म्हणजे शहराचे प्रवेशद्वार असलेला व शहराचे सौंदर्यात भर घालणारा रस्ता म्हणून ह्या रस्त्याची ओळख भविष्यात होणार आहे ठेकेदारांनी ह्या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करावे असे नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ सौं उषाताई तनपुरे ह्यांनी सांगितले.
नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या केंद्रीय रस्ते निधी योजनेतील पाण्याची टाकी (नगर मनमाड रस्ता ते स्टेशन रोड ते मांजरी )ह्या 3 कोटी 45 लाख 89 हजार 218 रुपये किमतीच्या रस्त्याचे काम व सौंदर्यकरण कामाचा भूमिपूजन समारंभ माजी नगराध्यक्षा डॉ सौं उषाताई तनपुरे ह्यांचे हस्ते व माजी नगराध्यक्ष अनिल कासार ह्यांचे अध्यक्षतेखाली रोटरी क्लबच्या रक्त पेढी जवळ संपन्न झाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे हभप प्रभाकर महाराज म्हसे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के पी वडीतके,वकील संघटनेचे अध्यक्ष राहुलभैय्या शेटे सूर्यभान म्हसे, बाळासाहेब उंडे,विट्टल विरकर,पटेल मास्तर अरुण विट्टल तनपुरे आदि उपस्थित होते.
डॉ सौं उषाताई तनपुरे ह्यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या तालुक्यातुन नगर मनमाड रस्त्याला जोडणाऱ्या राहुरी ते मांजरी व्हाया स्टेशन रोड नाका नं 5 मार्गे जाणाऱ्या ह्या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ह्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण व्हावे ह्यासाठी मी नगराध्यक्ष व श्रीमती चंद्रभागाबाई गीताराम तनपुरे ह्या नगरसेविका असताना एकनाथ तनपुरे व आम्ही खूप दिवस प्रयत्नशील होतो पण आज हा रस्ता राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे ह्यांनी अगदी अल्पवधीत ह्या रस्त्यास मंजुरी आणून ह्या रस्त्यासाठी 3 कोटी 45 लाख 89 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने ह्या रस्त्याcची सुधारणा व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आज होत आहे. ह्या रस्त्याचे काम जेव्हा सुरु झाले त्यावेळी रस्त्याचे कडेला असलेली अनेक जुनी झाडें तोडण्यात आल्याने हा भाग आज जरी भकास वाटत असला तरी भविष्यात ह्या रस्त्याचे कडेला दस पट झाडें लावण्यात येतील असा शब्द ह्या कामाचे ठेकेदार आर एच दरे ह्यांनी दिला असून ते लिंब वड पिंपळ आदि झाडें लावणार आहे.ठेकेदारांनी ह्या रस्त्याचे काम दर्जेदार करावे असे आवाहन यावेळी केले. (आज ह्या रस्त्याचे भूमिपूजन कामासाठी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे येणार होते पण अचानक मुंबई येथे बैठक लागल्याने व अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने येऊ शकले नाही. असा खुलासा केला ) ठेकेदार दिपक दरे ह्यांनी आपल्या भाषणात नगर मनमाड रस्ता ते स्टेशन रोड नाका नं 5 पर्यंतच्या रस्त्याचे काम निश्चित अतिशय चांगल्या दर्जाचे केले जाईल तसेच जी झाडें तोडली आहेत त्याबद्दल्यात दस पट जास्त झाडें रस्त्याचे दुतरफा लावली जातील असा शब्द देत ह्याठिकाणी पिंपळ वड व लिंब ही झाडें लावली जातील. रस्त्याचे काम सुरु करतानाच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व परिवाराने ह्या बाबत मौलिक सूचना दिल्या आहे
माजी नगराध्यक्ष अनिल कासार ह्यांनी आपल्या भाषणात राहुरी ते मांजरी स्टेशन रोड नाका नं 5 ह्या रस्त्याचे काम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी मंजूर करून आणला असून ह्या रस्त्यामुळे शहराचे सौंदर्यात भर पडणार आहे.
यावेळी नगरसेवक नंदकुमार तनपुरे शहाजी जाधव अशोक आहेर गजानन सातभाई संजय साळवे एकनाथ तनपुरे राजेंद्र बोरकर अशोक कदम पांडुरंग उदावंत राजेश कदम गणेश धाडगे प्रवीण कदम मुळा प्रवराचे माजी संचालक अय्युब पठाण,राहुरी सेवा संस्थेचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे आबासाहेब वाळुंज कान्हूजी तारडे कांता तनपुरे डॉ संकेत दुधाडे बाळासाहेब पेरणे अयुब शेख प्रवीण सुराणा रोहिदास अडागळे ज्ञानेश्वर जगधने सौरभ उंडे केतन पोपळघट आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव ह्यांनी प्रास्तविक व आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत