चाचांनी थोपटले दंड; बैठकीत व्यूहरचना; गैरहजर असलेले 'ते' बडे चेहरेही पुन्हा चर्चेत ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चाचांनी थोपटले दंड; बैठकीत व्यूहरचना; गैरहजर असलेले 'ते' बडे चेहरेही पुन्हा चर्चेत !

राहुरी : वेबटीम                                                          राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी चाचा तनपूरे...

राहुरी : वेबटीम           


                                             
राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी चाचा तनपूरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेत सत्ताधारी गटाविरोधात व्यूहरचना आखली. यावेळी  काही दिगग्ज विद्यमान नगरसेवक आणि स्वतःचा 'विजय' दृष्टीक्षेपात दर्शविणारे 'ते' इच्छुकही गैरहजर होते, त्यामुळे ही अनुपस्थिती बैठकीत चर्चेचा विषय ठरली.
   राहुरी नगरपालिकेवर राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांची सत्ता आहे. अनेक वर्षांपासून येथे सत्तांतर करण्यासाठी चाचा तनपुरे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले, खासदार विखे यांनीही रसद पुरवली आहे, मात्र त्यात यश मिळू शकलेले नाही. दरम्यान,  काल मुळा प्रवरा कार्यालयात आगामी निवडणुकीसाठी तयारी बैठक पार पडली. त्यात, नुकताच चार राज्यात भाजपने बाजी मारली असल्याने कार्यकर्ते उत्साही दिसून आले. या बैठकीत अनेक प्रभाग तोडण्यात आल्याने यावर आक्षेप घेण्याचे नियोजन झाले. यावेळी इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. अनेकांनी मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या अडचणी मांडल्या, चाचानी सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला चांगले वातावरण असून, जोमाने कामाला लागा, असे आवाहन केले. यावेळी अनेक विद्यमान नगरसेवक गैरहजर होते, यातील काही नगरसेवक भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती, त्यामुळे आजच्या बैठकीतील त्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरलो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत