राहुरी : वेबटीम रामपूर ता. राहुरी येथील राजकिय दृष्टया महत्वाच्या मानल्या जाना-या रामपूर विविध कार्य विकास सेवा संस्थेच्या संचालक...
राहुरी : वेबटीम
रामपूर ता. राहुरी येथील राजकिय दृष्टया महत्वाच्या मानल्या जाना-या रामपूर विविध कार्य विकास सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ग्रामविकास मंडळ व दक्षिणमुखी हनुमान जनसेवा मंडळ यांच्यात सरळ लढत होऊन ग्रामविकास मंडळाचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीकरिता संस्थेाच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती सराफ यांच्या अध्यसक्षतेखाली सभा संपन्न होऊन, संस्थेच्या चेअरमन पदी निवृत्ती खळदकर तर व्हा चेअरमन पदी रायभान पठारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन निवृत्ती खळदकर हे राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती स्वापतंत्र्य सेनानी कै रघुनाथ शंकरराव खळदकर गुरुजी यांचे पुतने असुन त्यांनी यापुर्वीही रामपूर ग्रामपंचायत मध्ये उप-सरपंच तसेच रामपूर सोसायटी मध्ये संचालक म्हणुन काम केलेले असल्याने त्यांचा अनुभव संस्थेला मार्गदर्शक ठरेल व संस्थेला नावलौकिक मिळवुन देइल अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली.
या निवडी प्रसंगी संस्थेचे सर्व नव नियुक्त संचालक तुकाराम नालकर, दत्तात्रय लोखंडे, नामदेव जगताप, नंदु साबळे, नामदेव सरोदे, भाऊसाहेब पठारे, रायभान पठारे, दशरथ भोसले, बाळासाहेब साबळे, उज्वला साबळे, शोभा नालकर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी सरपंच मिनाताई मोरे, उप सरपंच राहुल साबळे, माजी चेअरमन भाऊसाहेब साबळे, निवृत्तीे लोखंडे, इंद्रभान नालकर, सचिव पंढरीनाथ थेटे यांसह ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येेने उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे ग्रामविकास मंडळ तसेच दक्षिनमुखी हनुमान जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत