उंबरे : वेबटीम वै रघुनाथ महाराज उंबरेकर, वै पंढरीनाथ महाराज उंबरेकर,वै जनार्धन महाराज, वै लक्ष्मण महाराज, पंडित महाराज आदी संत महंतांच्...
उंबरे : वेबटीम
वै रघुनाथ महाराज उंबरेकर, वै पंढरीनाथ महाराज उंबरेकर,वै जनार्धन महाराज, वै लक्ष्मण महाराज, पंडित महाराज आदी संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उंबरे या पुण्यनगरीत तुकारामबीजनिमित्त उद्या सोमवार दिनांक 14 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ होत असल्याची माहिती संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हभप मच्छिंद्र महाराज ढोकणे यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उंबरे गावात तुकाराम बीज सप्ताहाची जय्यत तयारी झालेली आहे. या सप्ताहात नामांकित महाराजांची प्रवचने आणि कीर्तने होणार आहेत. त्यात, पहिल्या दिवशी 14 तारखेला रात्री 7 ते 9 या वेळेत आसाराम महाराज बडे, आळंदी, 15 तारखेला भागवत महाराज उंबरेकर, 16 तारखेला ज्ञानेश्वर महाराज झोळ, वशिंदें, 17 तारखेला ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली, आळंदी), 18 तारखेला एकनाथ महाराज चत्तर, 19 रोजी डॉ रामकृष्ण लहवितकर, 20 रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम , आळंदी यांचे कीर्तन होईल, सोमवार दि 21 रोजी सकाळी 10 वाजता मच्छिंद्र महाराज ढोकणे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. तत्पूर्वी, तुकाराम बीजनिमित रविवार 20 रोजी सकाळी बाळासाहेब महाराज रंजळे यांचे कीर्तन होणार आहे. दरम्यान, या सप्ताहासाठी ग्रामस्थ तनमनधनाने सहकार्य करत आहेत. सप्ताहात सूत्रसंचालन शब्दसम्राट आप्पासाहेब ढोकणे हे करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत