राहुरी/वेबटीम:- मौजे वावरथ (ता. राहुरी) येथे टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना शेळीपालन व श...
राहुरी/वेबटीम:-
मौजे वावरथ (ता. राहुरी) येथे टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना शेळीपालन व शेतकऱ्यांना सिंचन संचाचे साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य मा. डॉ. उषाताई तनपुरे ह्यांच्या शुभहस्ते व टाटा पॉवरचे श्री. नंदकुमार सत्रे ह्यांच्या प्रमुख उपस्थतीत तसेच ईतर मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देन्यात आहे. पारंपरिक वाद्य, गजा नृत्य, लेझीम व खेळ घेऊन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला.
ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विश्वास सोनवले ह्यानी करुण प्रकल्पाची आखणी, अंमलबजावणी आदी बाबींचा उलगडा करुण दिला. टाटा पॉवर च्या माध्यमातून मौजे वावरथ, शेरी चीखलठान, मंजरसुंबा, डमाळवाडी, बहिरवाडी व करंजी ह्या गावांमध्ये महिला व शेतकरी सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. ह्याची माहिती त्यांनी दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. डॉ. उषाताई तनपुरे ह्यांनी टाटा पॉवरचे कौतुक केले. टाटा समूहाच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमुळे सर्व सामान्य लोकांना फायदा झाला असुन आज वावरथ सारखे गाव निवडल्याने आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. ह्या गावातील गोर गरीब कुटुंबातील महिलांना शेळीपालन व्यवसायास चालना मिळेल व शेतकऱ्यांना सिंचन संचाचे साहित्य दिल्यानं नक्कीच फायदा होणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. टाटा समूहाच्या माध्यमातून देशभर झालेल्या कामांचा आढावा ही त्यांनी सांगून सदर सहा गावांच्या प्रकल्पास मा. प्राजक्तदादा नक्कीच मदत करतील असे त्या म्हणून टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट चे आभार मानले.
ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले श्री नंदकुमार सत्रे ह्यांनी टाटा पॉवर ने सामाजिक उत्तरदायित्व विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या कामामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आहे असे प्रतिपादन केले.
ह्यावेळी टाटा पॉवरचे प्रविण वाघ, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र चे जॉर्ज दाब्रिओ, ज्ञानेश्वर बाचकर, आण्णासाहेब सोडनर, पंचायत समिती सभापती बेबीताई सोडनर, प्रभाकर गाडे, आबासाहेब काळनर, आदी ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर बाचकर यांच्या भावना आनावर झाल्या . आमच्या छोट्याश्या दुर्गम गावांसाठी नामदार साहेबांनी मोठा निधी देऊन विकास कामे जोरात सुरू झाल्याने आनंदाने डोळ्याच्या कडा पान्हवल्या . गेल्या पंधरा वर्षात जेवढा विकास कामांना निधी मिळाला नाही तेवढा निधी दोन वर्षात उपलब्ध करून दिल्यामुळे पंचक्रोशीच्या वतीने नामदार साहेबांचे आभार मानले टारा पावरच्या माध्यमातून जे वाटप आज झालं त्यामुळे नक्कीच महिला व शेतकन्यांना उत्पन्नात वाढ होऊन जिवनमान उंचवण्यास मदत होईल असा अशावाद बोलुन दाखविला .
ह्या कार्यक्रमाला टाटा पॉवर चे प्रविण पाटील, प्रवीण शेंडकर, बॉस्को ग्रामीण विकास केंद्रचे दत्तात्रय गायकवाड, अर्जुन शरणागते, डॉ. शेरकर, अशोक कांडेकर आदींनी मेहनत घेतली. हकदर्षक संस्थेच्या प्रिया पंडित तसेच बचत गटाच्या महिला, पंचक्रोशीतील शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत