उंबरे : वेबटीम मुलांनो, मार्च 2022च्या परीक्षेला जाताना आत्मविश्...
उंबरे : वेबटीम
मुलांनो, मार्च 2022च्या परीक्षेला जाताना आत्मविश्वासाने आणि कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जा, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव ढोकणे यांनी केले.
आदर्श विद्यालय भाग शाळा उंबरे येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी उपसरपंच बापूसाहेब दुशिंग हे होते, तर प्रमुख पाहुणे भाऊराव ढोकणे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख भाऊराव ढोकणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सिताराम ढोकणे यांनी विद्यार्थ्यांना निरोप देतानाच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना खळखळून हसवले, तसेच राजेंद्र उंडे, बाळासाहेब महाराज डेंगळे, दत्तात्रय तरवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचा निरोप घेताना अतिशय दुःख होत आहे. विद्यालयातील शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच आमचे जीवनाला आकार देण्याचे काम केले,अशा भावना दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या तसेच मुख्याध्यापक भाऊसाहेब पानसंबळ, पर्यवेक्षक गोरक्षनाथ उगले, पंकज पवार, रावसाहेब कदम, यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला .यावेळी उपाध्यक्ष सिताराम ढोकणे तसेच दत्तात्रय तरवडे, गोरक्षनाथ शेजुळ, लक्ष्मण पटारे, राजेंद्र उंडे, बाळासाहेब महाराज डेंगळे, दत्तात्रय ढोकणे, गणेश ढोकणे,मुख्याध्यापक भाऊसाहेब पानसंबळ, उपमुख्याध्यापक अर्जुन गाडे, पर्यवेक्षक गोरक्षनाथ उगले, वर्गशिक्षक पंकज पवार, रावसाहेब कदम, नवनाथ महापुडे, मिलिंद राऊत, शिवाजी जाधव, श्री चांगदेव मरभळ, श्री रामदास गोडे , श्री संतोष बेलेकर, रावसाहेब पवार विजय माळवदे,श्रीधर आंधळे शिक्षक वृंद शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत