राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास प्रशासकी...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली त्यामुळे अनेक तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सध्या ठीक ठिकाणी असणारी कार्यालय अडचणीची व अडगळीची होती निधी मंजूर झाल्याने कार्यालय उभारणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे तालुक्यातील डिग्रस, धामोरी बुद्रुक, कात्रड ,सोनगाव ,निंभेरे,तांभेरे ,
कानडगाव , आरडगाव, खंडांबे बु उंबरे, कोंढवड, केंदळ बुद्रुक ,मानोरी ,पिंप्री वळण ,या गावांचा समावेश आहे प्रत्येकी एक तलाठी कार्यालय उभारणीसाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मिळणार असून तलाठी कार्यालय सुसज्ज होणार आहेत जागेची अडचणी व नैसर्गिक आपत्तीचा सामना तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करावा लागत होता कार्यरत असलेली तलाठी कार्यालयात पावसाळ्याच्या हंगामात पाणी साचून महत्त्वाची दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात येत असत गळके छप्पर उखडलेल्या फरश्यासह अन्य समस्यांचा सामना करावा लागत होता आता प्रत्यक्षातच निधी उपलब्ध झाल्याने कार्यालयांना येणारी संकटाची मालिका संपुष्टात येणार आहे मंत्री तनपुरे यांनी अधिक लक्ष घालत निधी उपलब्ध करून दिल्याने सर्व 14 गावातील विशेषता शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत