श्रीरामपूर/वेबटीम:- राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन प्रणित 'प्रोटॉन' शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक सागर माळी...
श्रीरामपूर/वेबटीम:-
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन प्रणित 'प्रोटॉन' शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक सागर माळी यांचा सत्कार करण्यात आला. सागर माळी हे श्रीरामपूर येथील पटेल हायस्कूलमध्ये कार्यरत असून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक १३१ चे बीएलओ आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माळी यांना जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी जिल्हास्तरीय आदर्श बीएलओ पुरस्काराने गौरविण्यात आले. माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल 'प्रोटॉन' शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने माळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी 'प्रोटॉन' राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, पुणे विभागाचे महासचिव विनोद राऊत, आर. एम. धनवडे, न्यू इंग्लिश स्कुल टाकळीभानचे प्राचार्य सोमनाथ मरभळ, सुधाकर बागुल, सर्जेराव देवरे, मनोजकुमार वैराळ, श्रीमती वैराळ, मधुकर पवार, बाबासाहेब थोरात, प्रेमनाथ सोनोने, श्रीधर कोकाटे, अनिल कोरडे, प्रितेश तांदळे, संदिप पाळंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत