सात्रळ महाविद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरी

सात्रळ(वेबटीम):- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ (ता. राहुरी) येथील क...

सात्रळ(वेबटीम):-


लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ (ता. राहुरी) येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व आयक्युएसी अंतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी सिन्नर मुसळगाव येथील ग्लोबल स्पेशल केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या वतीने सात्रळ महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 



          मुलाखतीमध्ये शुभम विलास साबळे,शैलेश दिलीप कडू,प्रज्वल दीपक ढमक,अक्षय किशोर पाटोळे,प्रसाद संजय घोगरे,ज्ञानेश्वर मधुकर नागरे या सहा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. कॅम्पस इंटरव्यूसाठी कंपनीचे मॅनेजर व सात्रळ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. नवनाथ शिंदे यांचे मोलाचे  सहकार्य लाभले.



       सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) सोमनाथ घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. याप्रसंगी प्रवरा प्लेसमेंन्टचे समन्वयक श्री. मनोज परजणे, प्रा. छाया कारले, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. अमित वाघमारे आदी उपस्थित होते. रोजगार मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. वैभव किशोर दिघे, प्रा. सुधीर वाघे, प्रा. तुषार कडसकर, प्रा. स्वाती कडू, प्रा. अश्विनी साळुंखे यांनी परिश्रम घेतले.



      यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री. भारत घोगरे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत