आकाश नागरेंच्या कार्यालयास काँग्रेसच्या दिग्गजांची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आकाश नागरेंच्या कार्यालयास काँग्रेसच्या दिग्गजांची भेट

कोपरगाव / प्रतिनिधी :-   तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील युवाने ते आकाश नागरे संचालित नामदार बाळासाहेब थोरात संपर्क कार्यालयास व शिक्षणप्रेमी...

कोपरगाव / प्रतिनिधी :-


 तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील युवाने ते आकाश नागरे संचालित नामदार बाळासाहेब थोरात संपर्क कार्यालयास व शिक्षणप्रेमी लहानू नागरे विकास कार्यकारी सेवा सोसायटीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री पल्लम राजू, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, युवक काँग्रेस प्रदेशध्यक्ष सत्यजीत तांबे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती वंदना मुरकुटे आदी दिग्गज नेत्यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले.


यावेळी सर्वांनी कार्यालय, रेनबो इंटरनॅशनल स्कूल व सोसायटीच्या कारभाराची माहिती घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. संस्थापक शिक्षणमहर्षी स्व. लहानू नागरे यांच्या कार्याचे कौतुक करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के  पाटील यांनी युवा नेते आकाश नागरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षामध्ये नागरे यांच्या सारख्या उच्चशिक्षित तरुणांनी पुढाकार घ्यावा असा सल्ला यानिमित्ताने त्यांनी दिला. यावेळी संस्थेचे संचालक, सदस्य, ग्रामस्थ, कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत