गुहा(वेबटीम):- एकाच वेळी क्यूआर कोड, यूपीआय मोबाईल ऑपचा व मल्टिस्टेटचे एटीएम कार्ड लाँच करून सुरेश वाबळे ह्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग...
गुहा(वेबटीम):-
एकाच वेळी क्यूआर कोड, यूपीआय मोबाईल ऑपचा व मल्टिस्टेटचे एटीएम कार्ड लाँच करून सुरेश वाबळे ह्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ग्राहकांना करून देणारी प्रेरणा पतसंस्था ही राज्यातील नावारूपाला आलेल्या पतसंस्थेतील एक पतसंस्था असल्याचे गौरवोदगार रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी काढले.
गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेच्या 29 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे ह्यांनी गुहा सारख्या ग्रामीण भागातील जनतेला बँकेचे व्यवहार करण्यासाठी क्यू आर कोड, यूपीआय मोबाईल ऑप व मल्टिस्टेट ग्राहकांना एटी एम कार्डचा लाँचिंग कार्यक्रम प्रसंगी श्री मराठे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसाद तनपुरे होते. यावेळी राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे, नाशिक विभागीय पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके ,वासुदेव काळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक शाम निमसे , साई आदर्शचे संस्थांपक शिवाजी कपाळे, जिल्हा निबंधक (सह )दिग्विजय आहेर, सहा निबंधक दिपक नागरगोजे, सरपंच सौ.उषा चंद्रे आदि प्रमुख उपस्थित होते.
श्सतीश मराठे यांनी आपल्या भाषणात देशामध्ये 1969 साली बँकानाचे राष्ट्रीयकृत बँकेत रूपांतर झाले. खऱ्या अर्थाने त्याचा फायदा देशातील सर्व सामान्य नागरिकांना पैसा उपलब्ध होऊ लागला.शहरी व ग्रामीण भागात पतसंस्थानी अनेक विकासाची कामे केली.पण या क्षेत्राकडे गेली 30 /35 वर्ष दुर्लक्ष झाले. सहकारी संस्थांना आज प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध व्हावा म्हणून सहकारी संस्थांची स्थापना झाली. पण तिथे राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला. आज जगात सहकार चळवळ ही खूप मोठी आहे. भारतात 8.50 लाख सहकारी संस्था असून 55 प्रकारच्या संस्था आहेत. त्याचे 30 कोटी सभासद असून या सहकारी संस्था खूप चांगले काम करतात.1991 साली देशात आर्थिक परिवर्तन झाले.पण त्याचा फायदा सहकारी चळवळीला होण्या ऐवजी खाजगी क्षेत्राला झाला. सहकार चळवळ हे आर्थिक प्रगतीचे मोठे माध्यम होऊ शकते. हे उशिरा समजले. देशातील ग्रामीण भागातील गावे खेडे वस्ती वाडी ह्यांना सहकार चळवळीचा मोठा फायदा झाल्याचे श्री मराठे ह्यांनी सांगितले.
देशात सहकार चळवळ ही मोठी आहे व ग्रामीण भागाचा विकास साधायचे असेल तर केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते निर्माण करावे ह्यासाठी आम्ही अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा ह्यांना सल्ला दिला होता. देशाच्या विकासात सहकाराचे मोठे वाटा आहे. तो वाढवला पाहिजे. आगामी 5 ते 6 महिन्यात सहकार चळवळीत अमूलग्र बदल जाणवू लागतील.आज कृषी उद्योगावर भर देण्याची गरज आहे. ते जर झाले नाही तर शेतकऱ्यांवर अन्याय होईल. विकास सेवा संस्था वाढल्या पाहिजे. कर्ज देणाऱ्या व ठेवी घेणाऱ्या सेवा संस्था पतसंस्थांना डिपॉझिट इन्शुरन्स लागू करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले.
माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी अध्यक्षीय भाषणात गुहा सारख्या जिरायत भागात जिथे प्यायला पाणी नव्हते अश्या भागात सुरेश वाबळे ह्यांनी प्रेरणा पतसंस्था काढून आज ती नावारूपाला आणली त्याबद्दल त्यांचे व त्याच्या सहकार्याचे करावे तेवढं कौतुक कमी आहे. विश्वस्ताची भूमिका पार पडताना ठेवीदार कर्जदार ह्यांचा विश्वास संपदान केल्याने आज हा टप्पा पार पडला. रिझर्व बँक राष्ट्रीयकृत बँकामध्ये मराठी युवकांना कुठेही स्थान नसल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी काका कोयटे, वसंत लोढा, शिवाजी कपाळे ह्यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थांपक सुरेश वाबळे ह्यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सुरेश बनकर,जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर जाधव, के. एम पानसरेz द्वारकानाथ बडधे ,नारायण जाधव ,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण ,बाळासाहेब उंडे, अण्णासाहेब चोथे, सुरेश निमसे, समता महिला पतसंस्थेच्या चेअरमन संगीता बुधवंत, सुमित वाबळे, जगन्नाथ डौले, दीपक त्रिभुवन, सुजित वाबळे, प्रदीप गरड शौकत शेख प्रेरणा पतसंस्था व मल्टिस्टेटचे सर्व पदाधिकारी विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. जावेद शेख ह्यांनी स्वागत तर प्रा वेणूनाथ लांबे ह्यांनी आभार मानले. सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत