राहुरी फॅक्टरी येथील कल्पना चावला उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील कल्पना चावला उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागातील कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा अड्डा बनला असून गेल्या काही दिवसांपास...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-




राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागातील कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा अड्डा बनला असून गेल्या काही दिवसांपासून   ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी असलेले हे उद्यान विद्रुप करण्याचे काम काही अतिउत्साही प्रेमी टोळ्यांकडून केले जात आहेत.


देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व बाल गोपालांना बागडण्यासाठी अदिनाथ वसाहत येथे कल्पना चावला उद्यान उभारले आहे.  मात्र हे उद्यान प्रेमी युगलांचा अड्डा बनला असल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रेमीयुगल जोडपे हॉटेल किंवा कॅफेमध्ये ओळखीचे कोणी भेटेल या भितीने आडोसा घेत आहेत. 


प्रेमी गुगल जोडप्यांच्या आडोशाची केंद्रे बनलेले कल्पना चावला उद्यान भागात नागरी वसाहत आहे. त्यामुळे ठिकाणी देवळाली प्रवरा नगरपालिकेने निदान सीसीटीव्ही लावावेत अशी मागणी होत आहे.

कल्पना चावला उद्यान लगतच महादेव मंदिर असून दर्शनासाठी नागरिकांची ये- जा सुरू असते. मात्र प्रेमींयुगल येथे बसत असल्याने  त्यांच्या लीला पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची देखील कुचंबणा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत