भनगडे यांच्यानंतर 'हे' भाजप समर्थक सरपंच करणार राष्ट्रवादीत प्रवेश! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भनगडे यांच्यानंतर 'हे' भाजप समर्थक सरपंच करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

आंबी(वेबटीम):- माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा आदर्श गाव गणेगावचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल भनग...

आंबी(वेबटीम):-


माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा आदर्श गाव गणेगावचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी मुंबई  येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राहुरी तालुक्यात भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर नामदार प्राजक्त तनपुरे यांचा हा 'मास्टर स्ट्रोक' समजला जात आहे. 

   भनगडे यांच्यानंतर राहुरी तालुक्याच्या उत्तरेकडील अमृतवाहिनी प्रवरा नदीकाठावरील गंगापूरचे कट्टर भाजप समर्थक प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश खांडके हे ३२ गावांतील आपल्या शेकडो समर्थकांसह लवकरच राष्ट्रवादीशी घरोबा करणार असल्याची चर्चा प्रवरा परिसरात सुरू आहे. नुकतीच त्यांचे सुपुत्र शंतनू खांडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या राहुरी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तेव्हापासून सरपंच खांडके राष्ट्रवादीवासी होणार का अशी दबक्या आवाजात परिसरात चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सरपंच सतिश खांडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू होणार हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत