राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च 2022 रोजी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून ल आज वैष्णवी चौक येथील महि...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च 2022 रोजी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून ल आज वैष्णवी चौक येथील महिलांशी कार्यक्रमाच्या रूपरेषा संदर्भात आज सौ. प्रीतीताई सत्यजित कदम यांनी सविस्तर चर्चा केली.
महिला दिनाच्या निमित्ताने सत्यजित कदम फांऊंडेशन देवळाली प्रवरा द्वारा विविध उपक्रम आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने मंगळवार दि 8 मार्च रोजी दु.ठीक 3 वाजता महिलांची भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राहुरी फॅक्टरी येथील अश्वारूढ पुतळ्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी सायंकाळी ठीक 6 वा राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनी येथे होम मिनिस्टर खेळ पैठण्यांचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे प्रतिपादन सौ. प्रीती कदम यांनी केले
यावेळी भाग्यश्री दोंड, कविता मोरे,पुष्पा दोंड, पुष्पा कदम,पूनम कुटे,सीमा लोंढे,अंजली सीनारे,रोहिणी कवाने, सविता कदम,मोनिका विटनोर,शीतल दोंड,उज्वला दोंड,धनश्री कदम, उषा नेहे,सोनाली कदम,साधना मोरे,प्रियांका मोरे,ज्योती गागरे,मीना कदम,रोहिणी कदम,वनिता कदम,कल्याणी कदम, छाया खुरपे,रोहिणी थोरात,सुलोचना कदम, नंदा कदम, कु.प्रिया कदम, कु. प्रीती कदम इत्यादी महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत