'तु मला आवडतेस,मी तुला लाईक करतो' असे म्हणणाऱ्या दोघांना जेलची हवा.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'तु मला आवडतेस,मी तुला लाईक करतो' असे म्हणणाऱ्या दोघांना जेलची हवा..

नगर विशेष प्रतिनिधी:-     'तु मला खुप आवडतेस...मी तुला लाईक करतो...हातवारे करून तो तिला अश्लील भाषेत बोलू लागला.सोबत असलेल्या त्याच्या म...

नगर विशेष प्रतिनिधी:-


    'तु मला खुप आवडतेस...मी तुला लाईक करतो...हातवारे करून तो तिला अश्लील भाषेत बोलू लागला.सोबत असलेल्या त्याच्या मित्रानेही 'तु तुझा मोबाईल नंबर माझ्या मित्राला दे' असे बोलून अश्लील वर्तन करून एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

         कर्जत येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी निर्भया (बदललेले नाव) दि.२ रोजी शिक्षणासाठी महाविद्यालयात आली असता तिला ईश्वर जयराम हुलगुंडे (रा.खंडाळा ता. कर्जत) याने हातवारे करून खुणावले.मात्र याकडे दुर्लक्ष करत निर्भया आपल्या घरी निघून गेली.त्यानंतर दि.४ रोजी निर्भया पुन्हा महाविद्यालयासाठी आली असता कर्जत बसस्थानक येथे तोच संबंधीत मुलगा आपल्या एका मित्रासह निर्भयाजवळ आला आणि 'तू मला आवडतेस व मी तुला लाईक करतो' असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत बोलून निर्भयाकडे पाहून हातवारे करू लागला.त्याचवेळी त्याच्या सोबत असलेला त्याचा जोडीदार निर्भयाजवळ येऊन म्हणाला की 'तु तुझा मोबाईल नंबर माझ्या मित्राला दे' यावेळी निर्भया यावर काहीच न बोलता पुढे चालू लागली. यावेळी दोघांनीही तिचा पाठलाग केला.भीतीपोटी निर्भयाने एका अनोळखी इसमाच्या फोनवरून आपल्या भावाला फोन करून हकीकत सांगून बसस्थानकात बोलावले.निर्भयाचा भाऊ तात्काळ त्या ठिकाणी आल्यानंतर निर्भयाने तिला त्रास देणारा मुलगा दाखवला. त्रास देणारी दोन्हीही मुले ईश्वर जयराम हुलगुंडे (रा. खंडाळा ता.कर्जत) व विजय हुलगुंडे (रा.गोयकरवाडी ता.कर्जत) अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले. निर्भयाच्या भावाने 'तुम्ही माझ्या बहिणीची छेड का काढली? अशी विचारपूस करत असता दोघांनीही तेथून पळ काढला.ही माहिती कर्जत पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.त्यानंतर निर्भया व तिच्या भावाने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन आरोपींवर विनयभंग भा.द.वी. कलम ३५४ (अ)(ड) तसेच (पोस्को) बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२ चे कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही आरोपींना काही तासात अटकही करण्यात आली आहे.किमान 15 दिवस ते 1 महिना आरोपीना जेलची हवा खावी लागणार आहे.


*याद राखा,मुलींना त्रास द्याल तर सोडणार नाही!*

       'कोणत्याही मुली-महिलांना कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर याद राखा,कुणाला सोडणार नाही.कोणत्याही मुलींबाबत असा प्रकार घडत असेल किंवा घडला तर तात्काळ कर्जत पोलिसांना कळवा.तक्रारदाराचे नाव गुपित ठेऊन त्रास देणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

       *-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत*.


सदरची कारवाई-

मा.पोलीस अधिक्षक सो.श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, 

अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, 

उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग श्री.आण्णासाहेब जाधव,


यांचे मार्गदर्शनाखाली 


कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, पोना शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत