कोपरगाव/वेबटीम:- शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्षभरातील सर्व सण -उत्सव त्या-त्या धार्मिक परंपरेप्रमाणे उ...
कोपरगाव/वेबटीम:-
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्षभरातील सर्व सण -उत्सव त्या-त्या धार्मिक परंपरेप्रमाणे उत्साहात व धुमधडाक्यात साजरे केले जातात . या विविध सणांच्या साजरीकरणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व व महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते . दि .१७ मार्च२०२२ रोजी होळी हा सण शाळेमध्ये उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. भक्ती टिळेकर या विद्यार्थीनीने होळी सणाची माहिती दिली. कला शिक्षक दत्ता डोखे यांनी होळी सणाची अख्यायिका सांगत ज्ञानवर्धक अशी होळीसणाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
मोनाली सुराळे यांनी प्रश्नमंजुषेतंर्गत विद्यार्थ्यांना होळीसणासंबधी महत्वाचे मुद्दे सांगितले . इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी होळी सणावर आधारीत कविता सादर केली . या साजरीकरणा अंतर्गतच विज्ञानदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी घेण्यात आलेल्या ' विज्ञानप्रयोग निर्मिती' स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . विज्ञानशिक्षक निलेश औताडे यांसह स्वाती हंडे यांनी या कामी विशेष कष्ट घेतले . प्रशासक सुरेश शिंदे , उप -प्राचार्य - प्रशांत भास्कर, प्रविण कदम, सोमनाथ सोनवणे यांच्यासह सर्व महिला शिक्षकांनी होळीचे पूजन केले व होलीका दहनाने कार्यक्रमाची सांगता झाली . सध्याची पिढी ही पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहे म्हणूनच अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केल्यानेच भारतीय संस्कृतीची विविधता व श्रेष्ठत्व टिकून आहे असे मत कार्यकारी संचालक आकाश नागरे यांनी व्यक्त केले . सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वेदांत वक्ते व कनिष्का बागुल या विद्यार्थ्यांनी केले .उत्कृष्ट सण साजरीकरणाबद्दल संस्थचे अध्यक्ष - कांतीलालजी अग्रवाल, सचिव - संजयजी नागरे, विश्वस्त-मनोजशेठ अग्रवाल, विश्वस्त - आनंदजी दगडे , विश्वस्त - वनिताताई नागरे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत