कोपरगाव - शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये कोरोना पार्श्वभूमी अंतर्गत सर्व नियमांचे पालन करत हसत - खेळत शि...
कोपरगाव -
शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये कोरोना पार्श्वभूमी अंतर्गत सर्व नियमांचे पालन करत हसत - खेळत शिक्षण पध्दती सुरु असुन मुलांची उपस्थिती देखील वाखाणण्याजोगी आहे . तथापि कोरोनाचे सावट जरी मावळते दिसत असले तरी अजुनही कोरोनारूपी संकटाने पूर्णतः आपली पाठ सोडलेली नाही त्याच अनुषंगाने शासनाने ३ जानेवारी २०२२ पासुन १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोवीड लस देण्याचा निर्णय घेतला होता या शासन निर्णयाचे स्वागत करत
दि .५ जानेवारी २०२२ रोजी रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्सीन लस देण्यात आली होती .तद्नंतर आज दिनांक १७ मार्च २०२२ रोजी शाळेतील १२ ते १४ वयोगटातील ७५ विद्यार्थ्यांना कॉर्बेव्हॅक्स लस देण्यात आली .
सदर लस ही जेऊर कुंभारी आरोग्य उपकेंद्रातंर्गत ( पी .एच .सी . संवत्सर ) देण्यात आली असुन आरोग्यवर्धिनी डॉ . अपर्णा आगवान, परिचारिका - हर्षाली बोरुडे , आरोग्य सेविका मंगल पठारे, अनिता मोहिते यांच्याद्वारे हे लसीकरण करण्यात आले . यादरम्यान शाळेचे प्रशासक - सुरेश शिंदे सर , उप-प्राचार्य - प्रशांत भास्कर , प्रविण कदम , सोमनाथ सोनवणे यांच्यासह संबधीत वर्गाचे वर्गशिक्षक उपस्थित होते . अतिशय सुरक्षित , शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात १२ ते १४ वयोगटातील पहिली लसीकरण मोहिम पार पडली . कोव्हीड पार्श्वभूमी अंतर्गत घेतल्या गेलेल्या या लसीकरण मोहिमेचे पालकांनी कौतुक केले . तर संस्थेचे अध्यक्ष -कांतीलालजी अग्रवाल, सचिव-संजयजी नागरे, विश्वस्त -मनोजशेठ अग्रवाल, विश्वस्त - आनंदजी दगडे , विश्वस्त - वनिताताई नागरे,कार्यकारी संचालक आकाशजी नागरे यांनी ही लसीकरण मोहिम राबविणाऱ्या आरोग्यदूतांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत