श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मधील वेश्या व्यवसायावर छापा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मधील वेश्या व्यवसायावर छापा

नगर/वेबटीम:-   आज दि.१७ मार्च रोजी Dysp संदिप मिटके   श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत...

नगर/वेबटीम:-


 आज दि.१७ मार्च रोजी Dysp संदिप मिटके   श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक) हा हायप्रोफाइल  महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी PI सानप श्रीरामपूर शहर , व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक)व विश्वास रामप्रसाद खाडे वय 26

रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्  यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api  विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ,  पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार  म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत