आंबी(संदीप पाळंदे):- राहुरी तालुक्यातील आंबी येथील समर्थ व साईराम दुध संकलन केंद्र यांच्या पुढाकाराने व हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य कंपनीच्या ...
आंबी(संदीप पाळंदे):-
राहुरी तालुक्यातील आंबी येथील समर्थ व साईराम दुध संकलन केंद्र यांच्या पुढाकाराने व हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य कंपनीच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या वाटप करण्यात आल्या. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शालेय व्यवस्थापन कमिटीच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कंपनीचे वरिष्ठ सेल्स ऑफिसर धिरज बोरसे, आकाश गोसावी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीव साळुंके हे होते. याप्रसंगी सेनेचे जेष्ट नेते विठ्ठलपंत कोळसे, पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे, सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, उपाध्यक्ष भीम कोळसे, माजी उपसरपंच, दादासाहेब साळुंके, रवी कोळसे, अशोक जाधव, जाफर इनामदार, पत्रकार विश्वनाथ जाधव, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, संदीप पाळंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोळसे, अनिल टाकसाळ, बाबासाहेब साळुंके, नानासाहेब कोळसे, सालबंदे, मुख्याध्यापक शौकत पिंजारी, उपशिक्षक, मनीषा गायकवाड, हरीश्चंद्र सोनवणे, अंगणवाडी सेविका कल्पना साळुंके, शितल कोळसे, मदतनीस मीरा रोडे यांसह पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कल्पना साळुंके यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत