राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील वडनेर, कणगर बु, ताहाराबाद, गडधे आखाडा गावात अवैधरित्या रित्या सुरू असलेले दगड खाणी उत्तखनन तातडीने थां...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील वडनेर, कणगर बु, ताहाराबाद, गडधे आखाडा गावात अवैधरित्या रित्या सुरू असलेले दगड खाणी उत्तखनन तातडीने थांबवावे अन्यथा उपोषण करू असा इशारा
छावा स्वराज्य रक्षक सेनेचे राहुरी तालुकाध्यक्ष नेल्सन कदम व जयभिम क्रांती सामजिक संघाचे अध्यक्ष सुभाष संसारे यांनी दिला आहे.
तहसीलदार शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, राहुरी तालुक्यात सामाजिक शैक्षणिक धार्मिक तसेच लोक शिक्षणाची कामे करीत असतांना सातत्याने वाढत चाललेला भ्रष्टाचार व त्या अनुषंगाने वाढत चाललेली दहशत दादागिरी यांचा नेहमीच अडसर निर्माण होत आहे. तसाच प्रकार सध्या राहुरी तालुक्यात सुरु असुन राहुरी तालुक्यातील वडनेर गावातील गट नं २४७/४/१ व कणगर ४२५/१/१/अ, ताहाराबाद २७/अ/३, ३२/२ ३२/१ गडधे आखाडा गट नं. १३५/१ या गट नंबरमधुन मोठ्या प्रमाणात अवैध्य दगडखान सुरु असुन संबंधीत दगडखान चालक व राहुरी तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांचे सह असलेले अर्थपुर्ण संबंधामुळे संबंधीत दगडखान चालक अवैध प्रकारे जिलेटीनचा वापर करून भुसुरुंग घेऊन मोठ्याप्रमाणात दगड उत्खनन करीत असल्याने भुसुरुंगामुळे गावातील अनेक नागरीकांच्या घरावर व घरासमोर मोठ मोठमोठे दगड उडुन पडुन त्यामुळे कामी लोक जखमी पण झालेले आहेत. परिसरातील नागरिक आपला जीव मुठीत धरुन गावात राहत आहेत. याबाबत आम्ही वेळोवेळी संबंधीत दगडखान चालकांबाबत लेखी व तोंडी स्वरुपाचा तक्रारी केलेल्या असुन अर्थपुर्ण संबंधामुळे त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. तरी संबंधीत दगडखानचालकांनी वरील गट नंबर मध्ये केलेल्या अवैध दगड उत्खननाचा पंचनामा करून त्वरीत कारवाई करावी अन्यथा आम्ही कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता सोमवार २८ मार्च २०२२ रोजी तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत