देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:- राहुरी तालुक्यातील कणगर गावचे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव घाडगे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पु...
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी:-
राहुरी तालुक्यातील कणगर गावचे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव घाडगे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कणगर गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्जेराव घाडगे यांनी लौकिक मिळविला.त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून घाडगे सरपंच सेवा संघाच्या वतीनआदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आ.निलेश लंके,पद्मश्री राहिबाई पोपेरे,ग्रामसेवा संघटनेचे राज्यअध्यक्ष एकनाथ ढाकणे,संस्थापक सरपंच सेवा संघ यादवराव पावसे,बाबासाहेब पावसे,राधेशाम गुंजाळ,रोहित पवार,अमोल शेवाळे,रविंद्र पवार,रविंद्र पावसे,निलेश पावसे,ह.भ.प.राजेंद्र गरुड, आदींच्या उपस्थित पुरस्कार वितरण करण्यात आले.
सरपंच सर्जेराव घाडगे यांच्या कार्याचा लेखाजोखा सन 1996 साली कणगर गावातील वस्तीवरील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांना संघटित करून मोर्चा काढला.समाज कारण क्षेत्रात कार्यरत असताना 1999 साली कनगर ,वडनेर,गणेगाव चिंचविहिरे, तांभेरे , तांदुळनेर इत्यादी दुष्काळी भागातील गावांना शेतीला पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी 20 वर्षे कागदावर असणाऱ्या मुळा उच्चस्तरीय डावा पाईप कालवा (भागडा पाईपचारी) ही योजना सुरू होणेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता श्रीशिवाजीनगर देवळाली प्रवरा येथे नगर मनमाड रस्त्यावर हजारो महिला व पुरुषांच्या उपस्थित रस्ता रोको केला व सन 2007 पर्यंत भागडा पाईप चारीचे पाणी दुष्काळी भागातील तलावात भागडा पाईप चारीचे पाणी पडेपर्यंत पाठपुरावा केला.
सन 2005 साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून बहुमताने निवड झाली.गावातील वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 50 लक्ष रुपयांची योजना मंजूर करुन आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान
सन 2008 साली भागडा पाईप चारी योजनेच्या अध्यक्ष पदी निवड.दुष्काळी भागातील लोकांना किमान जनावरांच्या चाऱ्या पुरते पाणी विहिरींना उपलब्ध व्हावे म्हणून पाटबंधारे विभाग महाराष्ट्र विज वितरण कंपनी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधून कोणावरही अन्याय न होता योग्य प्रकारे पाणी वाटप केले .पाणी वाटत करत असताना दरवेळी भागडा पाईप चारीचे फायदा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन शासना ची देय असणारी रक्कम शेतकऱ्यांकडून जमा करून भरली.1995 साली आदर्श गाव योजनेचे शिल्पकार पद्मश्री आण्णा हजारे यांचा कणगर गाव आदर्श करण्यासाठीचा दौरा महत्वाचे योगदान
दरम्यानच्या काळात फादर बाखर यांची राहुरी कारखान्याचे चेअरमन रावसाहेब साबळे यांच्या समवेत कणगरला भेट.भेटीत मा फादर बाखर यांनी गावातील डोंगर दऱ्यांचा दौरा करून कणगर मध्ये इंडो-जर्मनच्या माध्यमातून गावातील 3 ही पाणलोट क्षेत्रांचा विकास करण्याची तयारी दाखवली व नाबार्ड बँकेच्या माध्यमातून लगेच अनुदानित निधी उपलब्ध करून देऊ असे वचन दिले.गावाची द्विधा मनस्थिती निर्माण झाली.पद्मश्री आण्णा हजारे यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव योजनेत भाग घ्यायचा की फादर बाखर यांच्या संकल्पनेतील पाणलोट क्षेत्र विकास क्षेत्र कार्यक्रमात भाग घ्यायचा अशा वेळी लोकसहभागाने निर्णायक निर्णय घेऊन पाणलोट क्षेत्र विकास करण्याचा पर्याय निवडण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली.
पाणलोट क्षेत्र विकास समितीच्या स्थापने पासून ते आजतागायत सदस्य म्हणून काम पाहिले.पाणलोट क्षेत्र विकास समितीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी 16 टक्के श्रमदान केले.त्याची रक्कम आजपर्यंत ४० लक्ष रुपये असून राहुरी कारखाना व बँकांमध्ये सदर रकमेच्या ठेवी आहेत.
2005 ते 2010 कालावधीत ग्रामपंचायत सदस्य असताना राज्य शासनाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा गावाला तालुका पातळीवरील तिसरा पुरस्कार मिळवण्यात सिंहाचा वाटा. 2012 मध्ये गावासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा पुरस्कार मिळवण्यात सिंहाचा वाटा.
सामाजिक कार्य करत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांकडे आकर्षित सन 2012 ते 2017 शिवसेनेचे राहुरी तालुका प्रमुख म्हणून कार्यरत दरम्यानच्या काळात लोकहितासाठी व सरकारच्या चुकीच्या निर्णया विरोधात लोकहितासाठी रस्तारोको,अधिकाऱ्यांना घेराव घालणे मोर्चा काढणे इत्यादींसह विविध प्रकारची आंदोलने.दरम्यानच्या काळात 2010 पंचायत समिती निवडणूक लढवली व दरम्यानच्या काळात पराभव.
सन 2017 मध्ये शिवसेना तालुका प्रमुख या पदाचा राजीनामा. सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम सुरू ठेवले.सन 2018 साली कनगर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार व निवडणूक बिनविरोध केली. 13.डिसेंबर 2020 लोक आग्रहस्तव ग्रामपंचायत निवणुकीला पॅनल उभा करून बहुमताने निवणूक जिंकली.व 10 फेब्रुवारी 20121 सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला.
कोरोणा काळात लोकसमन्वय साधून शासकीय नियमांचे योग्यरीत्या पालन.
कोरोना काळात ग्रामस्तरावर जिल्हा परिषद शाळेत 20 बेडचे कोरंटाईन सेंटर उभारणी केली.व सिटी स्कॅन च्या 12 स्कोर पर्यंतचे पेशंट यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या CHO डॉ.सौ.खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील खाजगी डॉ. संदीप हारदे व आरोग्य सेविका सौ.सीमा अल्हाट व आशा सेविका,अंगणवाडी सेविका,जि.प.शाळेतील शिक्षक,कामगार तलाठी,पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने व गावाच्या आर्थिक व मानसिक मदतीने यशस्वीरित्या चालविले.
कोविड काळात शासनाच्या नियमानुसार कंटेन्मेंट झोनची उभारणी करणे,फवारणी करणे ,तसेच अंबुलन्स टीम तरुणांच्या माध्यमातून कोरून डिटेक्त टीम , रास्त भावात रेमडीसीवर उपलब्ध करण्यासाठी टीम,कोरून दक्षता कमिटी टीम, अशा वेगवेगळ्या कमिटी करून गावातील कोरून आटोक्यात आणला.त्याचे मा. तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी साहेब यांनी गावात येऊन कौतुक केले.
तसेच गावमध्ये ग्रामस्वच्छता अभियान लोकसहभातून राबविले.कोरोना काळात ज्या वस्त्यांवर कोरोना पेशंट नव्हते त्या वस्त्यांवरील जि. प. शाळा सुरळीत चालू राहाव्यात म्हणून प्रयत्न केले . सरकारने लसीकरण सुरू केल्यानंतर मा.तहसीलदार , गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात राहून गावातील तरुण , शिक्षण समित्या व आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने अल्प कालावधीत पहिला डोस 97 % पूर्ण केला .व दुसरा डोस 70 % पर्यंत पूर्ण केला लोकसहभागातून वाड्या वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवर मुरुमीकरण करून लोकांना जाण्या-येण्यासाठी चांगले रस्ते तयार केले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांसाठी वर्षभरात 1 कोटी रुपयांचे निधी डांबरी रस्त्यांसाठी पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्याची काही कामे पूर्ण झाले असून काही कामे सुरू आहेत.तसेच गावातील उर्दू शाळा इमारत व अंगणवाडी इमारत व इतर जि.प.शाळा व अंगणवाडी यांना भरभरून विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
आदर्श गावाकडे वाटचाल करण्यासाठी वस्त्या-वस्त्यांवर जाऊन जनजागृती केली.व गावात ग्रामसभा घेउन राजकारण विरहित गावाच्या विकासा साठी सर्वाना एकत्रित करून लोकसहभागातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर वृक्ष लागवड ,सुशोभीकरण त्याचप्रमाणे गावातील 5 जिल्हा परिषद शाळा व 6 अंगणवाड्या यांच्या प्रांगणात सुशोभीकरण व ग्रामस्वच्छता करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवला.
कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल अखिल भारतीय हिंदू वारकरी परिषदेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील कोविड योद्धा पुरस्कार मिळवला.दरम्यानच्या काळात कनगर अंतर्गत गाढे वस्ती जि. प.शाळेतील शिक्षक श्री.काकडे सर यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार मिळाला .
कोविड काळामध्ये कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामपंचायत अंतर्गत तरुणांचा व विविध अधिकारी व तरुणांचा कोविड योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मान केला.
विशेष उल्लेखनीय कार्य
पाणलोट क्षेत्र विकास समिती कनगर च्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा योजना प्रभावीपणे राबविली.भागडा पाईपचारी योजनेचा अध्यक्ष या माध्यमातून सलग 14 वर्षे गावतळे व ओढ्यावरील वसंत बंधारे भरण्याचे योग्य नियोजन.ग्रामपंचायत सदस्य म्हणून 2005 ते 2010 वाड्यावस्त्यांवर पाईपलाईनसाठी चे योगदान .
गावामध्ये सामाजिक व जातीय सलोखा राखण्याचे काम सरपंच या नात्याने कोरोना काळात लोकसहभागातून राबविलेल्या वेगवेगळ्या योजना, स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण लोकसहभागातून केले.
कनगर गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री.कनकावती माता मंदिराचा 2 वर्षे संपूर्ण वेळ देऊन लोकवर्गणी व लोकसहभागातून जीर्णोद्धार
भूषविलेली पदे
सदस्य पणलोट क्षेत्र विकास समिती कनगर आजपर्यंत, शिवसेना विभाग प्रमुख,शिवसेना 2004 ते 2012, सदस्य ग्रामपंचायत कनगर 2005 ते 2010, तालुका प्रमुख शिवसेना राहुरी तालुका सन 2012 ते 2019, सदस्य महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सन 2010 ते आजपर्यंत, सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती सन 2014 ते 2019, विशेष कार्यकारी अधिकारी सन 1995 ते 2000, अध्यक्ष स्वयंभू श्री.कणका वती माता देवस्थान, सरपंच ग्रामपंचायत कनगर सन 2021 पासून, जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजपा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत