राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या साम...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय समाज कार्य गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे शिव सरपंच सेवा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रदीप मकासरे यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, सामाजिक चळवळीतील नेते फ्रान्सिस संसारे, श्रीरामपूरच्या सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, कोपरगावच्या सभापती पोर्णिमाताई जगधने, उपसभापती किशोर जोजार, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच शिवश्री लक्ष्मण सरोदे, जयश्री शुक्ला, प्रदेश अध्यक्ष संजय वाघमारे, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले, साहेबराव पवार, सुदर्शन वाकचौरे, राजेंद्र पोतदार, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत