राहुरीफॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहचे आज सोमवारी गोविंद गिरी आश्...
राहुरीफॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहचे आज सोमवारी गोविंद गिरी आश्रम पिंपळवाडी येथील हरिभक्त पारायण महंत नित्यानंद स्वामी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
यावेळी नित्यानंद स्वामी महाराज यांनी उपस्थित भाविकांना स्वच्छता अभियान व प्लास्टिक मुक्त भारत जनजागृतीपर शपथ दिली.
गणेगाव येथील श्री दत्त व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा निमित्ताने सोमवार दिनांक १४ मार्च पासून हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला होता.या सप्ताह काळात कीर्तन, भजन ,गाथा,पारायण, हरिपाठ, आरती,दैनंदिन महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले दरम्यान रविवारी सायंकाळी गाथा मिरवणूक व दिंडी सोहळा तसेच दीपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न झाला आहे. आज सोमवारी सकाळी पिंपळवाडी येथील गोविंदगिरि आश्रमाचे महंत नित्यानंद स्वामी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता झाली.
दरम्यान यावेळी उपस्थित भाविकांना स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाची नित्यानंद स्वामी महाराज यांनी शपथ दिली यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक वर्ग उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत