आंबी/वेबटीम:- महाराष्ट्र विश्वकर्मा सेना (करागीर यूनियन) श्रीरामपुरचे तालुका कार्यकारिणीच्या वतीने विश्वकर्मा मंदिर बांधकाम कामी शिर्डीचे ...
आंबी/वेबटीम:-
महाराष्ट्र विश्वकर्मा सेना (करागीर यूनियन) श्रीरामपुरचे तालुका कार्यकारिणीच्या वतीने विश्वकर्मा मंदिर बांधकाम कामी शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांची भेट घेऊन सत्कार केला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष विलास भालेराव यांनी दिली. याप्रसंगी संघटनेने केलेल्या विविध कामांची माहिती शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांनी दिली. ही संघटना असंघटीत कामगारांच्या हितासाठी काम करते. विश्वकर्मा समाज हातावरील कारागीर आहे. तरीही विश्वकर्मा मंदिराचे कामासाठी गेली पंधरा वर्षांपासून मंदिर कामास मदत करत आहे. यासाठी कुठलाही शासकीय लाभ मंदिर कामासाठी झाला नाही. मंदिरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकामी सुमारे ४० ते ५० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून ६० टक्के काम पूर्ण होत आले आहे. यासाठी खासदार निधीतून भरीव मदात करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने खा. लोखंडे यांच्याकडे केली. त्यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करत मंदिर कामासाठी खासदार निधीतून मदत करेल असे आश्वासन दिले. तालुकाध्यक्ष विलास भालेराव यांनी खा. सदाशिव लोखंडे साहेब यांचे आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे, आदेश मोरे, शहर संघटक निलेश जाधव, उमेश शिरसाठ, संदीप वाघ, तालुका सचिव रविंद्र देवरे, शहर उपाध्यक्ष रंगनाथ शिरसाठ, नितीन खरे, राजेंद्र कपडे, आकाश शिंदे, मुरली मिस्त्री उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत