राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी शनिवार २ एप्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी शनिवार २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळावा या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य मोठ्या गटास प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये बक्षीस माजी नगराध्यक्ष तथा नगर दक्षिण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांच्याकडून तर द्वितीय ७ हजार रुपये मनसेचे राहुरी तालुका अध्यक्ष अनिल डोळस यांच्या कडून दिले जाणार आहे. सामूहिक नृत्य लहान गटासाठी प्रथम बक्षीस ७ हजार रुपये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, द्वितीय ५ हजार रुपये देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांच्याकडून दिले जाणार आहे. मोठा गट सोलो नृत्य प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, द्वितीय ५ हजार रुपये आदेश मोबाईल शॉपी राहुरी फॅक्टरीचे सर्वेसर्वा सचिन बजरंग जाधव यांच्याकडून तर तृतीय बक्षीस ४ हजार रुपये जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोठुळे यांच्यावतीने दिले जाणार आहे.
सोलो नृत्य लहान गटासाठी प्रथम बक्षिस ५ हजार रुपये राहुरीचे माजी नगरसेवक तथा कृ.उ.बा.स.राहुरीचे संचालक नंदकुमार तनपुरे , द्वितीय ४ हजार रुपये आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम तर तृतीय ३ हजार रुपये युवा उद्योजक अविनाश मुसमाडे यांच्यावतीने दिले जाणार आहे. ट्रॉफीसाठी स्व. गणिभाई शेख यांचे स्मरणार्थ मोहसीन शेख यांनी तर फ्लेक्ससाठी सुहास महाजन सर व सिद्धी इलेक्ट्रिकल्स, देवळाली प्रवरा यांनी सहकार्य केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी ७७०९०३७७५०, ९६६५९१९९३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत