पाथर्डी/वेबटीम:- पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील अतिशय चुरशीने पार पडलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्...
पाथर्डी/वेबटीम:-
पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील अतिशय चुरशीने पार पडलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा विकास मंडळाने सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकून एक हाती सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार मोनिकाताई राजळे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे गट आमनेसामने निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते.सदर निवडणुकीमध्ये आमदार मोनिकाताई राजळे समर्थक तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे माजी सरपंच जिजाबा तात्याबा लोंढे यांच्या अधिपत्याखालील जनसेवा विकास मंडळाने सर्वच्या सर्व तेरा जागांवर विजय मिळवत आपला राजकीय गड राखला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा जिजाबा लोंढे यांनी मार्केट कमिटी संचालक माणिक दसरथ लोंढे यांचा धुका उडून 231 मतांनी विजयी झाले सेवा संस्थेच्या निवडणुकीत वचपा काढला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आडगाव मध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
या निवडणुकीत जनसेवा विकास मंडळाच्या विजयासाठी माजी सरपंच लक्ष्मण भानगुडे, दुर्योधन लोंढे, भाऊसाहेब नजन.बाबासाहेब तोगे, गोरख भानगुडे,आदिनाथ लोंढे, तुकाराम मुंडे भाऊसाहेब सोन्नर धुळाजी लोंढे,शरद लोंढे,बाबासाहेब वाघमोडे,माणिक पटेकर, भिवसेन लोंढे,बाळासाहेब गोफणे, झुंबर लोंढे,भानुदास लोंढे,भाऊसाहेब बर्फे सर,साईनाथ तागड, परसराम लोंढे,साहेबराव भानगुडे,भाऊराव खताळ व हरी शेंडे लक्ष्मण भोसले.आदींनी परिश्रम घेतले.
सदर निवडणुकीमध्ये जिजाबा लोंढे,बबन तमनर,गोवर्धन नजन, रामनाथ बानगुडे,अंबादास लोंढे,कारभारी लोंढे, परसराम लोंढे, रामनाथ लोंढे, भिवाजी वाघमोडे, अशोक आखाडे,नदंराम एडके,विमल भानगुडे,तानाबाई लोंढे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
सदर निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.आमदार मोनिका ताई राजळे यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत