राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून स्व.बाळासाहेब ठाकरे योग भवन उभरण्यापुर्वीच राजक...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून स्व.बाळासाहेब ठाकरे योग भवन उभरण्यापुर्वीच राजकिय षडयंञाचा वापर केला जात असुन राहुरी फँक्टरी येथिल स्वदेशनगर येथील नागरी वस्तीत उभारले जात असताना केवळ विरोध करायचा म्हणून विरोध केला जात असून मुळातच स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे योग भवन होवूच नये अशी दत्ता कडू यांची इच्छा असल्याचे त्यांचा विरोधातून जाणवत आहे. कडू यांना नागरीकांचा लईच कळवळा असल्याचे दाखवत आहे. त्यांनी बाजारतळा नजीक असलेली स्वतःची विस गुंठे जागा नगर पालिकेस बक्षिस म्हणून द्यावी त्याजागेवर स्व.बाळासाहेब ठाकरे योग भवन उभारण्यात येईल.केवळ निवडणूक आल्यावर जनतेचे प्रश्न मांडयचे आणि आपली पोळी भाजुन घ्यायची. जनता एवढी दुधखुळी नाही. शहरासाठी आधी स्वतःचे योगदान दाखवा आणि नंतर योग भवनावर राजकारण करा असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल कराळे यांनी दिला आहे.
देवळाली प्रवरा येथे योगभवना वरून उदभवलेल्या वादावर शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,देवळाली प्रवरा हद्दीत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योगभवन बांधण्यासाठी खा.सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून ८० लाख रुपये देवळाली प्रवरा नगरपालिकेस मिळाले आहे.योगभवन बांधण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मालकीचा २० गुंठे आकाराचा रिकामा प्लॉट उपलब्ध नसल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांनी राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौका जवळील स्वदेशनगर मधील १८ गुंठे मोकळा प्लॉट नगरपालिकेच्या मालकीचा असल्याने याठिकाणी योगभवन बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेतली आहे. प्रशासकीय मान्यते नंतर योगभवनावरून दत्ता कडू यांच्यासह अन्य एक, दोन जण राजकीय षडयंत्र रचून स्व.बाळासाहेब ठाकरे योगभवनास राजकीय खोडा घालीत आहे.यास्वदेशनगर मध्ये योगभवन उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी नागरी वस्ती आहे योगभवनामुळे स्वदेशनगरच्या सौंदर्यात भर पडणार आहे.स्वदेशनगर पासून स्मशानभूमी लांब असतानाही केवळ राजकीय खोडा घालण्या करिता स्मशानभूमीचे कारण पुढे करून याठिकाणी होणाऱ्या योगभवनास कडू यांनी विरोध केला आहे.कडू यांचा नेमका योगभवनास की स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावास नेमका विरोध कशाला आहे. हे मात्र समजू शकले नाही. जर कडू यांना राहुरी फॅक्टरी येथे होणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे योग भवनास विरोध करायचा असेल तर त्यांनी देवळाली प्रवरात २० गुंठे जागा पालिकेस बक्षिसपञा द्वारे उपलब्ध करून द्यावी.दुसरी कुठेही जागा उपलब्ध होत नसेल तर स्वतःची बाजारतळा नजीक असलेली २० गुंठे जागा नगरपालिकेस बक्षीस द्यावी जर त्यांनी जागा बक्षीस दिली तर त्याठिकाणी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योगभवन उभारण्यात येईल मिळालेली प्रशासकीय मान्यता रद्द करून पुन्हा नव्याने देवळाली प्रवरासाठी प्रशासकीय मान्यता घेण्याची विनंती पालिका प्रशासनाला आम्ही स्वतः करू जर त्यांनी जागा बक्षीस रूपाने दिली तर त्यांचा नागरी सत्कारही करू असे कराळे यांनी सांगितले.
कराळे पुढे म्हणाले की,दत्ता कडू शासकीय अधिकारी होते. त्यांनी आज पर्यंत देवळाली प्रवरा साठी काय योगदान दिले? असा प्रश्न कराळे यांनी विचारला आहे. त्याचबरोबर गेल्या पंचवार्षिक नगरपालिकेच्या निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दत्ता कडू यांचा मुलगा अजिंक्य कडू यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले.कडू पिता पुत्राने नगरपालिका निवडणूकीच्या प्रचार सभे दरम्यान आमचा पराभव झाला तरी आम्ही जनतेची सेवा करणार आहे. परंतू निवडणूक निकाल लागताच अजिंक्य कडू यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी लागेच पुणे गाठले मग जनतेची सेवा कुठे गेली. गेल्या ५ वर्षात दत्ता कडू यांनी जनतेच्या प्रश्नावर एकही मत मांडले नाही जशी निवडणूक जवळ येऊ लागली तसा जनतेचा कळवळा दाटुन आला आहे. आता जनतेची प्रश्न मांडायला सुरुवात केली आहे. तेही राजकीय स्वार्थापोटीच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली पराभवानंतर शिवसेनेचे एकदाही नाव घेतले नाही. राजकीय स्वार्थापोटी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन राजकिय षडयंत्र सुरू केले आहे.जनता इतकीही दुधखुळी नाही तुम्हाला जनता ओळखून आहे.देवळाली प्रवरा शहरासाठी तुमचे योगदान सिद्ध करा आणि मगच स्व.बाळासाहेब ठाकरे योगभवनास तुम्ही विरोध करा असे जाहीर आवाहन कराळे यांनी केले आहे.
कराळे पुढे म्हणाले की,राजकीय षडयंत्रातून स्व.बाळासाहेब ठाकरे योगभवन बांधले न गेल्यास त्याचा निधी मागे जाईल देवळाली प्रवराच्या शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या योगभवनास खोडा घालण्याचे काम सध्या काही मंडळी करत आहे.देवळाली व राहुरी फॅक्टरी असा भेदभाव न करता दोन्हीही ठिकाण नगरपालिकेच्या हद्दीत असल्याने योगभवन कुठेही झाले तरी ते देवळाली नगरपालिकेचेच राहणार आहे.त्यामुळे चांगल्या कामाला विरोध करू नका स्व.बाळासाहेब ठाकरे नावाने योगभवनाची वास्तू उभी राहणार असल्याने या कामास राजकीय षडयंत्रातून विरोध करू नये घोडा मैदान जवळच आहे त्यावेळी काय राजकीय तोफा वाजवायच्या त्यावेळी वाजवा गावासाठी योगदान नसलेल्या माणसाने विकासकामांना विरोध करून हात दाखवून अवलक्षण करून घेऊ नये योगभवनासाठी आधी स्वतःची २० गुंठे जागा नगरपालिकेस बक्षीस रूपाने जाहीर करावी आणि मग स्व.बाळासाहेब ठाकरे योगभवनावर बोलावे असे कराळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत